कोरोनाचा कहर थांबवून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात याव्यात
पारनेर प्रतिनिधी
कोरोना चा कहर थांबण्याचे नाव घेत नसून दिवसेंदिवस कोरोनामुळे अनेकांना जीव गमवावा लागत आहे. नागरिकांच्या सुरक्षितता महत्वाची असून त्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना करण्याची मागणी राळेगण थेरपाळचे सरपंच पंकजदादा कारखीले यांनी केली आहे.
सरपंच पंकजदादा कारखिले यांनी खा. सुजयदादा विखे पाटील यांच्याकडे केल्या "या" मागण्या
१)रेशनिंग दुकानावर थंब घेतले जातात ती अट कोरोना काळात शिथिल करावी जेणेकरून कोरोनाचा होणार फैलाव रोखण्यासाठी मदत होईल.
२)विविध ग्रामपंचायत मार्फत सुरू होणाऱ्या कोवीड केअर सेंटरमध्ये औषध पुरवठा करण्यात आला पाहिजे.
३)कोरोना लसीकरण मोहीम फक्त प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून सुरू आहे ती उपकेंद्रांमध्ये सुरू करावी जेणेकरून एका जागी होणारी गर्दी कमी होईल व लसीकरणाच्या कामास गती येईल.
यावेळी तहसीलदार जोती देवरे व गटविकास अधिकारी प्रशांत माने उपस्थित होते.

0 Comments