शिवबा/प्रहार संघटनेचा इशारा.
पारनेर प्रतिनिधी
अळकुटी - निघोज - राळेगण थेरपाळ रस्ता नुकताच डांबरीकरण पार पडले आहे. या रस्त्याच्या साईटपट्ट्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून त्यात तातडीने सुधारणा करून काम उच्च दर्जाचे करावे अन्यतःकम बंद पडण्याचा इशारा शिवबा व प्रहार संघटनेच्या वतीने अध्यक्ष अनिल शेटे यांनी दिला आहे.
सध्या अळकुटी- निघोज या रस्त्याच्या साईटपट्टयाचे काम चालु आहे. १ मिटरची म्हणजेच ३ फुट ३ इंच रुंदि या साईटपट्टयाची आहे. काही ठिकाणी हे काम २ फुट देखील झालेले दिसत नाही. टाकण्यात येणारा मुरुम ओबडधोबड टाकण्यात येत आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. हे काम देवकर ठेकेदार करत आहे. सर्वसामान्य जनतेच्या खिशातील पैसा आहे व त्याचा वापर योग्य व्हावा हाच प्रयत्न शिवबा संघटनेचा असल्याचे अनिल शेटे यानी सांगितले.
सबंधित ठेकेदारास व येथे लक्ष देण्यास असलेला सुपरवायझर पडळकर यांना यासबंधीची माहिती देउन तातडीने सुधारणा करण्याबाबत शिवबा संघटना अध्यक्ष अनिल शेटे यानी सुचना केली. व सुधारणा न झाल्यास सबंधित अधिकार्यानकडे तक्रार करून काम बंद पाडण्याचा इशारा दिला आहे.
हे काम होत असलेल्या गावातील नागरिक व ग्रामपंचायत ने याबाबत जागरूक राहावे व दर्जेदार काम करून घ्यावे असे अहवान शिवबा संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.



0 Comments