हातावर पोट भरणार्यांना कोरोनाच्या लढ्यात उपाशी ठेवु नका - शरद पवळे
पारनेर प्रतिनिधी
कोरोना काळात सर्वत्र संचारबंदी आहे. गोरगरिब लोकांची हातची कामे गेली आहे. "अन्न दान हे सर्व श्रेष्ठ दान" आहे त्यामुळे हातावर पोट भरणाऱ्यांना कोरोनाच्या लढ्यात उपाशी ठेऊ नका असे अवाहान आधार फाउंडेशनचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी केले आहे. सुपा येथे आधार फाउंडेशन तर्फे हातावर पोट असणाऱ्या गोरगरिबांना फळे वाटप करण्यात आली.
आज देशावर ओढवलेल्या कोरोणा महामारीच्या संकटात सर्व सामान्य गोरगरीब जनता हवालदिल झालेली आहे. खान्या-पिण्याचे वांधे झालेले असताना भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधुन आधार फाउंडेशनसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सुपा परिसरातील हातावर पोट असलेल्या गोरगरीबांना सामाजिक बांधिलकी जपत फळे वाटप करण्यात आली. व समाजातील दानशुर व्यक्तींनी सुरक्षितता बाळगत पुढे येवुन "जनसेवा हिच खरी ईश्वरसेवा" या उक्तीप्रमाणे समाजातील गोरगरीब जनतेची भुक भागवीन्यासाठी असे उपक्रम केल्यास नक्कीच भुकेलेल्याला अन्न मिळेल. आपल्याला लाख मोलाचा आशीर्वाद "अन्न दान हे सर्व श्रेष्ठ दाण आहे" व कोरोनाने मानवासमोर मोठे आव्हान केले असुन या महामारीत,जगण्याच्या लढाईत पैसा महत्वाचा नसुन जीवन महत्वाचे असुन आपण सुरक्षित राहत ईतरांना सुरक्षित ठेवण्याची आपली जबाबदारी आहे. प्रत्यकाने आपल्या सभोवताली कुणीही उपाशी राहु नये यासाठी जागरुक राहण्याबरोबर नागरिकांनी आपल्याला कोरोनाची सुरुवातीची थोडीबहुत जरी लक्षणे असली तरी प्राथमिक आरोग्य केंद्राशी त्वरीत संपर्क साधावा. असे मत आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शरद पवळे,अविनाश पवार,डाॅ.पानगे,नितिन म्हस्के, सुपा शहर अध्यक्ष अक्षय सूर्यवंशी, राहुल जाधव, भैरवनाथ मोरे, दामु किसन दिवटे,मनोज गायकवाड व इतर कार्यकर्ता व महिला भगिनी यांच्या उपस्थित फळे वाटपाच्या उपक्रमावेळी आयोजकांकडुन करण्यात आले.
कोरोनाच्या लढाईत हातावर पोट भरणार्यांकडे उपचारासाठी पैसे नसुन त्यात वाढत चाललेला संसर्ग अशा परिस्थित काम केले नाही तर खायचे काय अशी संवेदनशील स्थिती गोरगरीबांसाठी अत्यंत हालाखीची बनली असुन गोरगरीबांच्या जीवनमरणाच्या लढाईत आपल्या जवळपास कोणी उपाशी राहणार नाही याची काळजी घेणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असुन अशा परिस्थित घामाच्या पैशातुन दान करणारे हेच तर खरे दानशुर - अविनाश पवार


0 Comments