पारनेरचे तहसीलदार ज्योती देवरे यांच्या वाढदिवसानिमित्त पारनेर तालुक्यातून शुभेच्छांचा पाऊस
वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या आभार संदेशासह कोरोना पासून बचावासाठी तहसीलदार ज्योती देवरे यांचे पारणेरकरांना भावनिक आवाहन
"तो संदेश सोशल मीडियावर व्हायरल...."
पारनेर प्रतिनिधी (चंद्रकांत कदम)
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांचा काल मंगळवारी १३ एप्रिल रोजी वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ते सध्या काम करत असलेल्या पारनेर तालुक्यातील "राजकीय,सामाजिक, धार्मिक व सर्वच स्थरातील मान्यवरांनी व सामान्य नागरिकांनी फोन द्वारे, सोशल मीडियावर व समोर भेटून अक्षरशः शुभेच्छांचा पाऊस पाडला. गेल्यावर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत "कुटुंबप्रमुखाची जबाबदारी" पार पाडत तालुक्याला कोरोनापासून वाचविण्यात यश आलेल्या तालुक्याच्या तहसीलदार ज्योती देवरे या सर्वांच्या कुटुंबातील सदस्य व "ताई" म्हणून नागरिकांच्या मनात घर करून बसल्या. काल गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांचा जन्मदिवस होता. तालुक्याभरातून हजारो ,लाखो शुभेच्छा त्यांना मिळाल्या. शुभेच्छांचा अक्षरशः पाऊस पडला. त्यामुळे पारनेर तालुका ही "जन्मभूमी की कर्मभूमी" हेच काही कळत नव्हते असे तहसीलदार ज्योती देवरे म्हणाल्या. त्यांच्यावरील नागरिकांचे असणारे प्रेम व स्नेह लक्षात घेता त्यांनी सर्व नागरिकांना आभार पर एक संदेश सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.त्यात त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या सर्वांचे आभार मानले आहेत. त्याखेरीज तालुक्याच्या कुटुंबप्रमुख या नात्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नागरिकांनी सतर्क राहून आपल्या व आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याचे भावनिक आवाहन केले आहे.
वाचा तहसीलदारांनी नेमके काय आवाहन केले आहे संदेशातून
तहसीलदार ज्योती देवरे 👇🏻
काल दिवसभर शुभेच्छांची रीघ लागली होती..
पारनेरकरांचे माझ्यावरील प्रेम व विश्वास हीच माझी काम करण्याची उर्जा आहे.
काल तब्बल २५ वर्षानंतर पुन्हा माझा वाढदिवस गुढीपाडव्याच्या दिवशी आलेला...दुग्धशर्करा योग जुळून आला अगदी...पारनेरच्या सर्व गोड माणसांच्या गोड शुभेच्छा..केकची कोंदणे..अन् फुलांचे ताटवे...मन जणू तृप्त होऊन गेले...पारनेर ही कर्मभुमी आहे की जन्मभुमी असा प्रश्न पडला जरा वेळ...ईतके प्रेम एखाद्या शासकीय अधिकार्याच्या वाटेला येणे ही दैवी कृपाच म्हणावी लागेल..तुमच्या प्रेमातुन कधी मुक्त होताच येणार नाही..।
माझ्याही तुमच्यावरील हक्काने मी आता एकच विनंती करेल..पहिल्या लाटेत मी दिलेल्या हाका तुम्ही तंतोतंत पाळल्या..आता दुसर्या लाटेची नतद्रष्टता पहिलीपेक्षा वाढली आहे...पहिल्या लाटेत तिला जे वाहुन नेता आले नाही ते प्रयत्न आता ती जोमाने करतेय...
कल्पना करा तुम्ही सागर किनार्यावर शंख शिंपले गोळा करत उभे आहात...समुद्र खवळतोय..दीपस्तंभ सावध करतेय..पहिली लाट येतेय...आपण तयारीत आहोत..वाळुत सुरक्षित अंतरावर घट्ट पाय रोवून ऊभे आहोत ...पहिली लाट आली आपण वाचलोत...लाटेचे आपल्याला वाहुन नेण्याचे मनसुबे धुळीला मिळवलेत...मग आपण त्या आनंदात नाचू लागलोत..आपण अशे बेभान असताना ती नव्या ताकदीने दुसरी लाट बनुन येऊ लागलीय ...आता या बेसावध क्षणी ती किती जणांना वाहुन घेऊन गेलीय ते सांगता येत नाही आणि जे अजुनही भानावर येत नाही त्यांना ती किती दुर घेवून जाणार आहे ते ही कळत नाही..दीपस्तंभ धोक्याच्या सुचना देतोय पण अजुनही कित्येक जण लाटेवर स्वार होऊन जाऊ अशी दिवास्वप्नेही पहात आहेत..काहींना कळते पण वळत नाही..काहींना वळतेही पण आॅक्सिजन मिळत नाही..o2 मिळाला तर इंजेक्शन मिळत नाही..काहीकाहींना तर बेडच मिळत नाही..प्रयत्न करुनही अपयश आले तर पुन्हा स्मशानातही जागा धरण्यासाठी नातेवाईकांना नंबर लावावा लागतोय....होय हे स्वप्न नाही खरे आहे..दुसरी नेहमीच पहिलीपेक्षा खतरनाक असते..पहिलीच तोंड दाबता आलं..दुसरीचं नाक दाबता यायला हवं आता...!!!
चला तर मग त्यासाठी किनांर्यावर सुरक्षित ठिकाणी आपण आपल्या प्रियजनांना घेवुन जाऊ या...सध्या फक्त जीव वाचवु या..पुढची स्वप्ने नंतर बघू...सध्या फक्त घरात बसु या..समुद्रावर जायचे नंतर बघू!!!!!!
ही लाट निघुन जाऊ द्या...ही वेळ निघुन जाऊ द्या...आपली मुळं धरुन ठेऊ घट्ट........पुढचा वाढदिवस आणि पुढचा गुढीपाडवा साजरा करण्यासाठी .....!!!!!!!!!
चला तर मग उठा...राष्ट्रवीरहो.....
तुमची ताई
तहसिलदार पारनेर .🙏🙏🙏🙏

0 Comments