प्रशासनावर राजकीय दबाव, समाजाची सेवा करण्यापासून मला कोणी रोखू शकत नाही - डॉ श्रीकांत पठारे
डॉ. श्रीकांत पठारे व सहकाऱ्यांच्या वतीने पारनेर येथे १०० बेडचे अद्ययावत कोव्हीड सेंटर सुरू....
पारनेर प्रतिनिधी
प्रशासनावर राजकीय दबाव आहे, त्यामुळे माझ्या सहकाऱ्यांच्या वतीने सुरू केलेल्या कोव्हीड सेंटर ला प्रशासनाकडून सहकार्य मिळत नाही. सध्याची परिस्थिती राजकारण करण्याची नसून मी करत असलेल्या सामाजिक सेवेपासून मला कोणीच रोखू शकत नाही असे मत पारनेर पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे यांनी व्यक्त केले.
गुढी पाडवा व नूतन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर आज पारनेर या ठिकाणी ओंकार हॉस्पिटल पारनेर, ग्रामीण रुग्णालय पारनेर व डॉ श्रीकांत पठारे मित्र परिवाराच्या सहकार्यातून 100 बेड चे ऑक्सिजनयुक्त अद्ययावत कोव्हीड सेंटर चालू झाले.
विधानसभेचे माजी उपाध्यक्ष ना. विजयराव औटी यांच्या पत्नी माजी सभापती सौ. जयश्री ताई औटी यांच्या शुभहस्ते तसेच शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख श्री रामदास भोसले व पारनेरकर महाराज यांचे प्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थिती मध्ये लोकार्पण सोहळा पार पडला.
कोरोना महामारी चा वाढता प्रभाव , तालुक्यात रुग्णांना बेड ची कमतरता व ऑक्सिजन बेड उपलब्ध भेटत नसल्याने रुग्णांची होणारी फरफट व त्यातून काही रुग्णांना जीव गमवावा लागला असल्याचे डॉ. श्रीकांत पठारे यांच्या निदर्शनास आल्याने हा अभिनव उपक्रम त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने हाती घेतला आहे. त्यांच्या या भूमिकेचे संपूर्ण तालुक्यात कौतुक केले जात आहे. पारनेरकर महाराज यांचे "पूर्णवाद भवन" या ठिकाणी हे हेल्थ केअर सेंटर चालू करण्यात आले. पारनेर नगर पंचायत च्या माजी सभापती सौ जयश्री ताई औटी यांनी पारनेरकर महाराज यांनी कोव्हीड सेंटर साठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल पारनेरकर महाराज यांचे आभार मानून, डॉ श्रीकांत पठारे व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले. तसेच नागरिकांना सुरक्षित राहण्याचे तसेच आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन केले.
डॉ श्रीकांत पठारे यांचे कार्य कौतुकास्पद आहे, या कोव्हीड सेंटर मुळे सामान्य नागरिकांना मोठा आधार मिळणार आहे, नागरिकांनी आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी.
सौ. जयश्री ताई विजयराव औटी
सामाजिक कार्यात देखील काही लोक राजकारण करत आहेत. ही गोष्ट चुकीची आहे, राज्यात महाविकास आघाडी चे सरकार आहे. यापूर्वी देखील डॉ.श्रीकांत पठारे यांच्या पुढाकाराने कोविड सेंटर चालू केले होते, तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीला अभिमान वाटावा असे कार्य डॉ.श्रीकांत पठारे यांनी केले आहे.
श्री.रामदास भोसले - शिवसेना उपजिल्हा प्रमुख
नागरिकांच्या आरोग्याचा दृष्टीने व प्रशासनावरील ताण कमी करण्यासाठी कोव्हीड सेंटर सुरू केले आहे परंतु प्रशासन आम्हास योग्य ती मदत करत नाही. प्रशासनावर कुणाचा तरी दबाव आहे, सामाजिक कार्यात सध्याची परिस्थिती पाहता राजकारण करणे चुकीचे आहे. मी माझे रुग्णसेवेचे काम करत राहणार कोणी कितीही आडकाठी आणली आणि काहीही झाले तरी हे कार्य पार पाडणार आहे. समाजाची सेवा करण्यापासून मला कोणीही अडवु शकणार नाही.
डॉ.श्रीकांत पठारे (सदस्य पंचायत समिती पारनेर, संचालक ओंकार हॉस्पिटल पारनेर)

0 Comments