सामाजिक कामासोबतच डॉ पठारे कोरोना रुग्णांना देणार वैद्यकीय सेवा
डॉ श्रीकांत पठारे उभारणार १०० बेडचे कोव्हीड सेंटर
चंद्रकांत कदम । पारनेर
पारनेर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांना उपचारासाठी दवाखाने तातडीने उपलब्ध होत नसल्याने रुग्णांची हेळसांड थांबविण्यासाठी पारनेर पंचायत समिती सदस्य डॉ. श्रीकांत पठारे ओंकार हॉस्पिटल पारनेर च्या वतीने हे १०० बेडचे कोव्हीड सेंटर उभारणार आहेत. त्यासाठी त्यांनी तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडे परवानगी मागितली असून लवकरच कोव्हीड सेंटर सुरू होणार असल्याची माहिती डॉ. श्रीकांत पठारे यांनी दिली.
सामाजिक बांधिलकी जपत कोरोना ग्रस्त रुग्णांसाठी काहीतरी वैद्यकीय मदत करण्याचा माझा व माझ्या सहकाऱ्यांचा मानस आहे. कोव्हीड सेंटर मध्ये अत्याधुनिक सेवा सुविधा, डॉक्टर, प्रशक्षित स्टाफ, ऑक्सिजन या सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्यास कोरोना रुग्णांना उपचार देने शक्य होऊ शकते. आणि आम्ही ते करू शकतो म्हणून आपण प्रशासनाकडून जी जबाबदारी मला व माझ्या सहकाऱ्यांना द्याल ती जबाबदारी आम्ही यशस्वीपणे पार पाडू. त्यासाठी आपल्या प्रशासकीय पातळीवरून ओंकार हॉस्पिटल पारनेरच्या समोर असणारे विश्व विद्या प्रतिष्ठान चे "पूर्णवाद भवन" याठिकाणी १०० बेडचे कोव्हीड सेंटर सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी मागणी पारनेर पंचायत समितीचे सदस्य व ओंकार हॉस्पिटल पारनेर चे संचालक डॉ श्रीकांत पठारे यांनी पारनेरचे तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडे केली आहे.


0 Comments