शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी जोडधंदा असणारा दुग्धव्यवसाय आधुनिक पद्धतीने करण्याची गरज - अ‍ॅड आझाद ठुबे

 

पिंपरी जलसेन

शेतीला पूरक असलेल्या जोडधंदा दुग्धव्यवसाय आहे. दुधाला हमीभाव नसल्याने शेतकरी संकटात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी दुग्धव्यवसायात आधुनिकीकरण करणे गरजेचे असल्याचे मत माजी जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड आझाद ठुबे यांनी व्यक्त केले.

"कामधेनू दत्तक ग्राम योजना" शिबिरात शेतकऱ्यांना जनावरांचे औषधे, लस व मका बियाणे वाटप करताना माजी जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड आझाद ठुबे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ सुभाष झावरे व उपस्थित शेतकरी.

पिंपरी जलसेन येथे महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर, पारनेर पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पशुवैद्यकीय दवाखाना निघोज यांच्या अंतर्गत "कामधेनू दत्तक ग्राम योजना" कार्यमोहिम व प्रबोधन शिबीर आयोजित केले होते. या शिबिराचे उदघाटन माजी जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड आझाद ठुबे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पिंपरी जलसेनचे उपसरपंच वर्षा पानमंद, अप्पासाहेब कदम, दगडू बोरुडे, भाऊसाहेब पानमंद, संतोष थोरात, निघोज पशुवैद्यकीय दवाखाण्याचे अधिकारी डॉ सुभाष झावरे आदी व्यासपीठावर होते.

   


    अ‍ॅड आझाद ठुबे बोलताना म्हणाले की, शेतकऱ्यांची आठवड्याची कमाई असणारा दुग्धव्यवसाय हा जोडधंदा आहे. या दुग्धव्यवसायातून शेतकऱ्यांना अधिकचा नफा मिळण्यासाठी त्यांना मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्हा परिषदच्या माध्यमातून "कामधेनू दत्तक ग्रामयोजना" सूरु करण्यात आलेली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेणे गरजेचे असल्याचे आवाहन ठुबे यांनी केले. शेतकऱ्यांच्या हितासाठी पशुवैद्यकीय अधिकारी जोमाने काम करत असून त्यांचे काम उल्लेखनीय आहे. असे बोलत ठुबे यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले. गावची एकी असल्यास गावात अनेक योजना राबविता येतील. जिल्हा परिषद सदस्या सौ उज्वलाताई ठुबे यांच्या माध्यमातून  पिंपरी जलसेनमध्ये मराठी शाळा खोली बांधणे, कोकनेशेत येथे २१ लाखांचा बंधारा, गावातील समाजकल्याण अंतर्गत असलेल्या १० लाखांच्या कामांस मंजुरी मिळाली असून लवकरच या कामांचे उदघाटन करून प्रत्यक्षात कामास सुरुवात करणार असल्याचे आझाद ठुबे यांनी सांगितले.

पशुवैद्यकीय अधिकारी डॉ सुभाष झावरे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की,आधुनिक उपकरणांचा वापर करून शेतकऱ्यांनी दूध उत्पादन वाढवण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने व आमच्या मार्गदर्शनाखाली दुग्धव्यवसाय केल्यास शेतकऱ्यांना अधिकचा नफा मिळण्यास मदत होईल. आम्ही वेळोवेळी शिबिराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहोत. शेतकऱ्यांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन देखील डॉ झावरे यांनी केले. शिबिरात गावातील जनावरांना वंध्यत्व निवारण इंजेक्शन, गोचीड इंजेक्शन, जंत नाशक औषध, टॉनिक व मक्याच्या बियाण्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी भास्कर थोरात, दगडू थोरात, बबन घेमुड, भानुदास साळवे, पत्रकार चंद्रकांत कदम, बाळासाहेब वाढवणे, आदिनाथ कदम, विश्वनाथ कदम, सुभाष वाढवणे, सागर बोरुडे, दिनेश शेळके, पोपट अडसरे, दत्ता वाढवणे, बन्सी वाढवणे, चेतन गाडेकर, विश्वनाथ कदम आदींसह पशुपालक शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी पशुवैद्यकीय दवाखान्याचे अधिकारी [पशुधन विकास अधिकारी डॉ सुभाष झावरे, डॉ गाडीलकर, डॉ ओहोळ, पशुधन पर्यवेक्षक डॉ पवार, डॉ बांगर, कर्मचारी दत्ता बोरुडे,जगदाळे, दळवी काळे, डॉ बोरुडे, डॉ खोसे यांसह कर्मचारी वर्गाने मेहनत घेतली.

Post a Comment

0 Comments