पारनेर प्रतिनिधी
मानवाने निसर्गावर केलेल्या आक्रमणामुळे सर्वत्र झालेल्या वृक्षतोडीमुळे निसर्गाच्या कालचक्रामध्ये मोठे बदल घडुन पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे गावागावातील जुन्या जलश्रोतांच्या पाण्याच्या गळतीमुळे पाण्याचा मोठा तुटवडा सातत्याने निर्माण होत असुन याचा राज्याच्या तिजोरीवर मोठा भार निर्माण होत आहे. त्याचबरोबर कोरोनासारख्या संकटांमुळे राज्यासह देशाच्या तिजोरीवर मोठा अतिरीक्त भार निर्माण झाला असुन त्यामुळे मोठमोठी खर्चाची कामे सरकारला करताना समस्या येणार आहेत. तरी महाराष्ट्रात "मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेच्या माध्यमातुन पुरातन जलश्रोतांच्या दुरुस्तीचे काम उल्लेखनीय असुन ते गावागावात पोहचणार असुन जलश्रोतांचा वापर पुर्ण क्षमतेने करण शक्य होणार आहे. त्यासाठी जागरुक व सुज्ञ नागरीकांनी पाण्याची गळती होणार्या जलश्रोतांच्या यादीचे ग्रामसभेचे ठराव गावागावातुन मृद व जलसंधारण विभागाकडे तात्काळ जम करावेत व जुन्या जलश्रोतांच्या दुरुस्तीचे पारदर्शक काम करुन गावासह राज्याला पाण्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण, स्वावलंबी व जलमय करण्याच आपल सर्वांच स्वप्न पुर्ण करुन पुढच्या पिढीच भविष्य उज्वल करुया असे मत सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी वृत्तपत्राशी बोलताना व्यक्त केले.
महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी "मुख्यमंत्री जलसंवर्वन योजना"वरदान असुन जागरुक नागरीकांनी पाझर तलाव,गाव तलाव,बंधार्यांसह पुरातन पाण्याची गळती होणार्या जलश्रोतांचा आढावा घेवुन त्यांच्या दुरुस्तीच्सा मागणीचे ठराव मृद व जलसंधारण विभागाकडे देवुन गावाला जलमय,स्वावलंबी करण्याच स्वप्न पुर्ण करा - पवळे

0 Comments