भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश संघटनेच्या जिल्हासंघटक पदी भानुदास साळवे यांची निवड

 

श्री. भानुदास पांडुरंग साळवे

पारनेर 

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचार विरोधी लढा देणाऱ्या राज्यव्यापी भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश सामाजिक संघटनेच्या अहमदनगर जिल्हासंघटक पदी पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील भानुदास पांडुरंग साळवे यांची निवड करण्यात आली आहे.

       भानुदास साळवे हे गेल्या १० वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत. आतापर्यंत त्यांनी दलित महासंघाच्या जिल्हा कार्याध्यक्ष पद घेऊन दलित समाजातील लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या ते पारनेर तालुका लोकजागृती सामाजिक संघटनेच्या माध्यमातून तालुक्यात भ्रष्टाचार विरोधी काम करत आहेत. तालुक्यातील भ्रष्टाचारी अधिकारी वर्गाला लाचलुचपत पथकाच्या माध्यमातून वठणीवर आणण्याचे काम त्यांनी केले आहे. पारनेर तालुक्यातील गौनखनिज कर बुडवणाऱ्या खडी क्रेशर धारकांकडून हरित लवादाच्या माध्यमातून लाखो रुपयांचा दंड वसूल करून दिला आहे. तालुक्यातील दारूबंदी चळवळीत देखील त्यांचा मोलाचा सहभाग आहे. त्यांच्या या कामाची दखल घेत भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश संघटनेच्या जिल्हासंघटक पदी भानुदास साळवे यांची निवड करण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचार विरोधात लढा देणारी ही राज्यव्यापी सामाजिक  संघटना आहे. या संघटनेच्या जिल्हासंघटक पदी भानुदास साळवे यांची निवड प्रदेश उपाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांनी केली आहे. साळवे यांच्या निवडीबद्दल  लोकजागृती सामाजिक संघटनेचे अध्यक्ष बबन कवाद व रामदास घावटे यांच्यासह पारनेर तालुकाभरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments