सैनिक बँकेतील NPA अपहार व अन्य प्रकरण.
रोख ठोक न्यूज पुणे
पारनेर सैनिक सहकारी बँकेतील अपहार रक्कमेचा गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याने संबधितावर आधिकाऱ्यावर कारवाई व्हावी व शासकीय रक्कम हडप करणाऱ्या सैनिक बँक अधिकारी व संचालक मंडळ यांच्यावर गुन्हे दाखल होण्यासाठी सहकार आयुक्त कार्यालय पुणे येथे अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे नगर जिल्हाध्यक्ष अरुण रोडे, जिल्हा सचिव श्री.वैभव पाचारने, पारनेर तालुका अध्यक्ष पप्पू कासोटे,भरत हाटावकर, बाळासाहेब धरम, सैनिक बँकेचे सभासद विनायक गोस्वामी मंगळवार दिनांक ०२/०२/२०२१ रोजी सहकार आयुक्त पुणे येथे उपोषणास बसणार आहेत.
सविस्तर माहिती अशी की पारनेर तालुका सैनिक सहकारी बँक शाखा कर्जत येथे शाखाआधिकारी,क्लार्क यांनी संगनमताने व वरिष्ठांच्या आशीर्वादाने संजय गांधी निराधार योजनेतील बँकेत जमा होणाऱ्या रक्कमेत अपहार केल्याची तक्रार वैभव पाचारने यांनी सहकार आयुक्त पुणे यांना केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी बँकेतील घोटाळ्याची दखल घेऊन सहकार आयुक्तांना विशेष लेखापरीक्षका मार्फत सखोल तपासणी करण्याचे पत्र दिले होते. विशेष लेखापरीक्षक अहमदनगर यांनी आयुक्त यांच्या पत्राने तपास करून तसा अहवाल सहकार आयुक्तांना दिला होता त्यावर सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी संचालक मंडळ दोषी असल्याचा अहवाल दिला होता. कर्जत शाखेचे शाखा व्यवस्थापक सदाशिव फरांडे यांचेवर दोन गुन्हे दाखल असूनही संचालक मंडळ त्यांचेवर सेवा नियमाप्रमाणे कारवाई करत नसल्याने संचालक मंडळावरच सहकार कायदा नुसार कारवाई व्हावी.
तसेच सुरेश किसन रासकर व सुंनदा रभाजी शेळके यांची जमीन बेकायदेशीर रित्या लीलाव केला आहे.त्या बाबत सहकार खात्याच्या तपासणीत दोषी आढळूण येऊन व पोलिसांनी जबाब नोंदवूनही गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याने त्वरीत गुन्हा दाखल व्हावा.
सैनिक बँकेतील १० कर्मचाऱ्यांचे पारनेर पोलिस स्टेशनला जबाब नोंदण्यात येऊनही गुन्हा का दाखल करत नाही?
सैनिक बँकेत शासकीय सरचार्ज रक्कमेत अपहार झाल्याचा स्पष्ट अहवाल असूनही गुन्हा का दाखल होत नाही?अजित यशवंत वाळुंज व मोहन कुशाबा चौधरी यांचे बोगस कर्जाबाबत उच्च न्यायालयाने आदेशीत करून पारनेर पोलिस स्टेशन येथे जबाब नोंद होऊनही गुन्हा का दाखल होत नाही? याचा स्पष्ट अभिप्राय सहकार आयुक्त पुणे यांनी द्यावा.तसेच सैनिक बँकेचे १४०५ नियमबाह्य झालेले सभासद फेर चौकशी करून रद्द करावे.
कर्जदारांची जमीन बोगस लिलाव करून जमीन हडप करण्यामध्ये तत्कालीन तलाठी, मंडलाधिकारी,दुय्यम निबंधक पारनेर, यांचेवर गुन्हा दाखल करण्यात यावा या मध्ये सामील असलेले सैनिक बँकेचे चेअरमन शिवाजी व्यवहारे , मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोरडे यांचे वर गुन्हा दाखल व्हावा.
सैनिक बँक चेअरमन शिवाजी व्यवहारे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोरडे या जोड गोळीने व संचालक यांनी नियमबाह्य स्व:ताच्या मुलांना(नातेवाईक)१५ कर्मचारी यांना बँक सेवेत घेतल्याने त्यांच्यावर कारवाई व्हावी. चांडेश्र्वर विकास सो. सा. चांडगाव श्रीगोंदा व राजमाता अहिल्यादेवी विकास सो. काष्टी श्रीगोंदा यांचे लेखापरीक्षण मध्ये अपहार केल्याचा अहवाल येऊनही संबंधीत अधिकारी व पदाधिकारी यांचेवर गुन्हा दाखल होत नसल्याने उपोषण करीत आहे. सैनिक बँकेत आर्थिक गैरव्यवहार असुन ज्या ज्या प्रकरणात सहकार खात्याचा दोषी असल्याचा अहवाल आला आहे त्या प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी करावी. स्पष्ट गुन्हे दाखल करण्याचा अभिप्राय मिळावा या मागण्या व इतर काही सामाजिक मागन्यासाठीउपोषण करणार असल्याचे अन्याय निर्मूलन सेवा समिती चे जिल्हा अध्यक्ष अरुण रोडे यांनी सांगितले.


0 Comments