सरपंचपदी राहुल शिवाजी सुकाळे तर उपसरपंचपदी पूनम महेंद्र खुपटे या उच्चशिक्षित तरुणांची निवड.
पारनेर प्रतिनिधी
वडनेर बु. ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये पारनेर तालुका सैनिक बँकेचे उपाध्यक्ष शिवाजीराव सुकाळे यांच्या नेतृत्वात गुरुदत्त जनसेवा पॅनलने सत्ता राखली आहे. सरपंचपदी राहुल शिवाजी सुकाळे तर उपसरपंचपदी पूनम महेंद्र खुपटे यांची निवड झाली आहे.
सरपंच पदासाठी सुकाळे गटाकडून राहुल सुकाळे तर उपसरपंच पदासाठी पूनम खुपटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. विरोधी गटाकडून सरपंच पदासाठी मनिषा कारभारी बाबर आणि शोभा सर्जेराव येवले तर उपसरपंच पदासाठी संतोष मोहन पवार व शैला संजय जगदाळे यांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी शोभा येवले आणि शैला जगदाळे यांनी अर्ज मागे घेतले. सरळ लढतीमध्ये राहुल सुकाळे आणि पूनम खुपटे यांना प्रत्येकी सहा मते मिळाल्याने दोन्हीही उमेदवार विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश पळसे यांनी जाहीर केले. ग्रामसवेक हरिश्चंद्र काळे यांनी श्री पळसे यांना कामकाजात मदत केली.
यावेळी सुकाळे गटाचे राहुल सुकाळे, पूनम खुपटे, स्वाती नऱ्हे, रेखा येवले, रमेश वाजे व आशाबाई चौधरी हे सहा सदस्य तर विरोधी गटाकडून मनिषा बाबर, शोभा येवले, संतोष पवार, शैला जगदाळे, राहुल बाबर हे पाच सदस्य उपस्थित होते.
सरपंच उपसरपंच निवडीनंतर गुलाल उधळून जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी काशिनाथ वाजे गुरुजी, गंगाराम पवार, शिवाजी चौधरी, पांडुरंग पवार गुरुजी, जांबुतचे चेअरमन बाळासाहेब बदर, फाकटे गावचे मा. सरपंच गुलाब वाळुंज, निघोजचे नवनिर्वाचित उपसरपंच माऊली वरखडे, भाऊसाहेब शेटे, पांडुरंग निचित, भाऊसाहेब येवले, बबन वाजे, किसन चौधरी, कचरू नऱ्हे, नाथा सुकाळे, गेणभाऊ वाजे, पांडुरंग येवले, अनिल नऱ्हे, विकास वाजे, भागा बाबर, शिवाजी पवार, रणजित बाबर, पृथ्वीराज खुपटे, माऊली बाबर, अजित वाजे, योगेश पवार, अरुण निचित, रेवजी चौधरी, संतोष चौधरी, प्रकाश सुकाळे, मारुती नऱ्हे, तानाजी चौधरी, मंगेश पडवळ, हनुमंत चौधरी, सुरेश सुकाळे, साहेबराव चौधरी, पांडुरंग नऱ्हे, रामदास नऱ्हे, राहुल बाबर, बाळासाहेब सुकाळे, संतोष जगदाळे, गोरक्ष बोचरे, दशरथ बोचरे, मनोज वाजे, विक्रम सुकाळे, संदीप चौधरी, अरुण सुकाळे, सखाराम सुकाळे, पिराजी पवार, अंकुश सुकाळे, संतोष वाजे, बाबाजी वाजे, वैभव पवार, विवेक वाजे, अजित मेचे, गणेश चौधरी, संदीप वाजे, रामदास वाजे, बाळू वाजे, सतिश गजरे, मधुकर शिंदे, प्रकाश भंडारी, रोहन गायकवाड, रावसाहेब वाजे, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामसमृद्धी फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास वाजे, पांडुरंग येवले, अनिल नऱ्हे, शिवाजी पवार, वाजे गुरुजी यांनी नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

0 Comments