कर्जत सैनिक बँक संजय गांधी निराधार योजनेच्या भ्रष्टाचार प्रकरणी बँकेचे संचालक व अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत - अन्याय निर्मूलन सेवा समितीची मागणी

 

पारनेर

  पारनेर तालुका सैनिक बँकेच्या कर्जत शाखेत संजय गांधी निराधार योजनेत भ्रष्टाचार करून मयत खातेदाराच्या खात्यावरील पैसे हडप केलेप्रकरणी बँकेच्या 2 अधिकाऱ्यांवर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु या बँकेतखूप मोठा भ्रष्टाचार झाला असल्याने आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने चौकशी करून बँकेचे संचालक व अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत.  अशी मागणी अन्याय निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे, पारनेर तालुकाध्यक्ष पप्पू कासुटे, जिल्हा सचिव वैभजव पाचर्णे व भरत हटावकर यांनी जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 



              याबाबत सविस्तर असे की, पारनेर सैनिक बँकेच्या कर्जत शाखेत शाखाधिकारी व कर्मचारी यांनी संगनमताने संजय गांधी निराधार योजनेच्या मयत लाभार्थ्यांच्या खात्यावरील पैसे हडप करून अपहार केला होता. त्याप्रकारणी अन्याय निर्मूलन सेवा समितीने पाठपुरावा केल्यानंतर लेखापरीक्षण अहवालानंतर कर्जत पोलीस ठाण्यात अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु सदर गुन्ह्यात अपहराची रक्कम मोठी असल्याने आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने सखोल चौकशी करून बँकेच्या संचालक व अधिकाऱ्यांवर देखील गुन्हे दाखल करावेत. तसेच कर्जतचे तत्कालीन तहसीलदार यांचे देखील या अपहाराशी हात असल्याने त्यांची देखील चौकशी करून त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करावेत अशी मागणी अन्याय निर्मूलन सेवा समितीच्या वतीने जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments