देऊळगाव सिद्धी (ता श्रीगोंदा) येथे श्री गोरक्षनाथ प्रगट दिनानिमित्त आयोजित सप्ताहाची काल्याच्या किर्तनाने सांगता
पारनेर चंद्रकांत कदम
गेल्या १६ वर्षांपासून समाजातील रंजल्या गांजलेल्यांची सेवा तात्या महाराज काटकर यांनी केली आहे. त्यांचे जीवन समाजासाठी त्यागमय असल्याचे गौरवोद्गार ह.भ.प धनंजय महाराज खोडदे यांनी काढले.
श्री गोरक्षनाथ प्रगट दिन सप्ताहात काल्याच्या कीर्तनात दहीहंडी फोडताना ह.भ.प धनंजय महाराज खोडदे व ह.भ.प तात्या महाराज काटकर. छाया - चंद्रकांत कदम.
देऊळगाव सिद्धी (ता श्रीगोंदा) येथे ह.भ.प तात्या महाराज काटकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या श्री गोरक्षनाथ प्रगट दिनानिमित्त आयोजित सप्ताहाचा काल्याच्या किर्तनाने शनिवारी (दि.२८) सांगता झाली. त्याप्रसंगी ह.भ.प खोडदे महाराज यांची किर्तनरुपी सेवा झाली त्यावेळी ते बोलत होते. ते बोलताना पुढे म्हणाले की, गोरक्षनाथांचा महिमा साऱ्या जगाला अपरंपार ज्ञात आहे. त्यांचा दैविक साक्षात्कार ह.भ.प तात्या महाराजांना गेल्या १६ वर्षांपूर्वी झालेला आहे. तेव्हापासून तात्या महाराजांनी समाजातील रंजल्या-गांजल्या, कष्टकरी , रुग्णांची सेवा केली आहे. आपल्या दैवी शक्तीच्या माध्यमातून विनामोबदला समाजातील लोकांची सेवा केली आहे. त्यांनी स्वतःचे आयुष्य समाजसाठी वाहून घेतले आहे. समाजासाठी त्यांचा खूप मोठा त्याग आहे. समाजातील लोकांनी देखील त्यांचा आदर्श घेऊन आपापल्या परीने लोकांची सेवा केली पाहिजे असे मत ह.भ.प धनंजय महाराज खोडदे यांनी व्यक्त केले.
गेल्या आठ दिवसांपासून श्री गोरक्षनाथ प्रगट दिनानिमित्त आयोजित सप्ताहात ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन, जागर आदी कार्यक्रम पार पडले. काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता झाली. कोरोनामुळे सामाजिक अंतर ठेवून प्रशासकीय नियमांचे पालन करून हा कार्यक्रम पार पडला. यावेळी अनेक सिद्ध सेवक व भक्तगण उपस्थित होते.
0 Comments