राळेगण थेरपाळच्या सर्वांगीण विकासासाठी सरपंच पंकज कारखिले यांना सहकार्य करु - सचिन वराळ पाटील

 पारनेर प्रतिनिधी

राळेगण थेरपाळचे सरपंच पंकज कारखीले आदर्शवत काम करत आहेत. अल्पावधीतच त्यांनी कोट्यवधींची विकासकामे गावात मार्गी लावली असून राळेगण थेरपाळच्या सर्वांगीण विकासासाठी सरपंच पंकज कारखीले यांना सर्वोत्तपरी सहकार्य करू असे आश्वासन संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांनी केले.


     आज राळेगण थेरपाळ या ठिकाणी सोनवणे ते टेकाडी वस्ती या ठिकाणी सुमारे १२ लक्ष रूपये किंमतीच्या सी डी वर्क या कामाचे भुमिपुजन झाले. यावेळी बोलत असताना संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे अध्यक्ष सचिन भाऊ वराळ म्हणाले राळेगण थेरपाळ च्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत व सरपंच पंकजदादा कारखिले यांना सहकार्य करु. सामान्य जनता हीच आमचे दैवत असून त्यांची सेवा करणे हे आमचे कर्तव्य आहे. यावेळी अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य दिनेशदादा बाबर तसेच सरपंच पंकजदादा कारखिले, उपसरपंच अलका ताई घावटे, योगेश आढाव, भरत शितोळे, माऊली शितोळे, चेअरमन अंकुश कारखिले, व्हा चेअरमन दामोदर टकले, शशिकांत कारखिले,बाळकृष्ण कारखिले,, सुखदेव कारखिले, सोन्याबापू डोमे, नरेश सोनवणे, मंगेश कार्ले, कैलास डोमे, विश्वनाथ डोमे, बंटी कारखिले, अतुल मोरे, बाळा कार्ले, प्रवीण कारखिले, गणेश कारखिले, किरण कारखिले, आबा कारखिले, सागर कारखिले, सागर डोमे, अक्षय इचके, दिनेश कारखिले, काका कारखिले, विक्रम कारखिले, युवराज अवचार, रवि कारखिले, रमेश कारखिले, अशोक कारखिले, प्रभाकर कारखिले, सुनील कारखिले, संजय कारखिले, राजेंद्र शितोळे गुरुजी, सनी सोनवणे, रविदादा कारखिले, सुरेश कारखिले, भरत ठुबे, डॉ कवाद, भाऊ सरोदे, काका ढमढेरे सतिश कारखिले आदी मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

0 Comments