पारनेर प्रतिनिधी
नवोपक्रमशील शाळा म्हणून विविध स्पर्धांमध्ये कायम यशस्वी कामगिरी करणारी पारनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेची पिंपरी जलसेन प्राथमिक शाळेने इ.५ वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात नेत्रदिपक यश संपादन केले. गुणवत्तेचा ध्यास घेवून चाललेल्या या शाळेने यावर्षीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये ( फेब्रु २०२० ) अतिशय दर्जेदार असे यश संपादन करुन यावर्षी शाळेचे तब्बल १४ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत पात्र झालेले आहे. ग्रामीण भागातील शाळा असून देखील अतिशय नेत्रदीपक यश या शाळेने संपादन केले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये या शाळेचे सर्वाधिक विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत असून पारनेर तालुक्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्येही या शाळेचे सर्वाधिक विद्यार्थी आहेत त्याबद्दल विविध स्तरांतून या शाळेच्या कामगिरीवर कौतुकाची थाप पडत आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये- गणेश बढे- २५८ (राष्ट्रीय ग्रामीण संच )जिल्हयात सातवा, अनन्या खोडदे-२५२ (ग्रामीण सर्वसाधारण संच ) जिल्ह्यात प्रथम , स्वराली पुणेकर- २३६, अस्मिता खोडदे- २३२, वेदप्रकाश मते- २३०, श्रावणी गाडेकर-२२६, निरंजन सोनवणे-२२४, ओम लोंढे-२२२, राजश्री अडसरे-२२२, शिवराज बढे- २१८, साहील शेळके-२१४, ज्ञानेश्वरी थोरात-२१४, सार्थक परांडे-२१०, अन्वेश कदम-२०८ यांचा समावेश आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेच्या यशस्वी कामगिरीबरोबरच शाळेमध्ये अनेक उपक्रम चालू असतात. त्यामध्ये रुबिक क्यूब, पाढे पाठांतर, जलतरण प्रशिक्षण , होवूया स्मार्ट चालता-बोलता, कराटे- तायक्वांदो प्रशिक्षण इत्यादी विविध उपक्रम शाळा यशस्वीपणे राबवत असून आसपासच्या दहा गावातून या शाळेत ६० विद्यार्थ्यांचा प्रवेश झालेला आहे. शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी कामगिरी पाठीमागे वर्गशिक्षक व शिष्यवृत्ती मार्गदर्शक श्री. सतीश भालेकर त्याचप्रमाणे श्री. मल्हारी रेपाळे , श्रीम. रत्नमाला नरवडे, श्री. जयप्रकाश साठे, श्री. भास्कर औटी त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक श्री रा.या.औटी यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.
पिंपरी जलसेन ग्रामस्थ त्याचप्रमाणे केंद्रप्रमुख सौ. विजया नवले, शिक्षण विस्तार अधिकारी श्री.सखाराम ठूबे, पारनेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. बाळासाहेब बुगे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.

0 Comments