पारनेर तालुक्यातील शिव पाणंद शेतरस्ते पिडीत शेतकर्‍यांचा संवाद बैठकीत मत्वपुर्ण निर्णय

 पारनेर प्रातिनिधी



पारनेर तालुक्यात शिव पांणद शेतरस्ते पिडीत शेतकर्‍यांनी पारनेर तालुक्यातील शेतरस्त्यांच्या समस्या असणार्‍या गावोगावच्या शेतकर्‍यांनी तालुक्यात अनेक आंदोलनानंतर गावोगावी शेतकर्‍यांच्या प्रत्यक्ष बांधावर जावुन शिवपाणंद शेतरस्त्यांच्या प्रत्यक्ष पाहणीबरोबर पाझर तलावांची बंधार्‍यांची गळती झालेली पाहणी केली या प्रश्नावर काम करण्यासाठी  शेतकर्‍यांनी एकत्र येत पारनेर येथे संवाद बैठकीचे आयोजन केले होते याबैठकीत प्रत्येक शेतकर्‍याचे प्रश्न समजुन घेतले व याविषयाला व्यापक करुन प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येकाने आपापले मनोगत व्यक्त केले यावेळी रविवार दि.२०/१२/२०२० रोजी सकाळी१०.०० ते १२.०० वा.शासकीय विश्राम गृह पारनेर येथे तालुक्यातील शेतरस्ते पिडीत शेतकर्‍यांसह तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार,सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्‍यांसह विविध अनुभवी मान्यवरांना अन्नदात्याचा मुळ प्रश्न सोडवण्यासाठी व चळवळीत सहभागी करुन घेवुन चळवळीची व्यापकता वाढवुन पदाधिकार्‍यांची निवड करण्यात येणार असुन यासंदर्भात बैठकीत निर्णय घेण्यात आला यावेळी शिव पाणंद शेतरस्ते व पाणीदार महाराष्ट्र जनजागृती कृती समितीचे प्रणेते शरद पवळे,संजय कनिच्छे,भास्कर शिंदे,रघुनाथ कुलकर्णी,पांडुरंग कळमकर,संपत जाधव,अशोक अबुज,सुर्यकांत सालके,गोरक्ष कवाद,राजेंद्र कारखिले यांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



शिव पाणंद शेतरस्ते नवनिर्माण कृती समिती व पाणीदार महाराष्ट्रसाठी पाझर तलाव,बंधारे यांसाठी प्लॅस्टिक पेपर अस्तरणीकरण जनजागृती अभियानाच्या वतीने उभारण्यात आलेल्या "आवाज दो" जनआंंदोलनाच्या वतीने संवाद बैठकीत नव्या सभासदांची निवड करण्याचा ठराव करण्यासह पुढील दिशा ठरवण्यात आली - शरद पवळे.

Post a Comment

0 Comments