जि प सदस्य पुष्पाताई वराळ यांच्या प्रयत्नातून मंजूर कामाचे राळेगण थेरपाळ येथे भूमिपूजन

पारनेर प्रतिनिधी

 जिल्हा वार्षिक योजना 2019-20 अंतर्गत जिल्हा परिषद सदस्या श्रीमती.पुष्पाताई संदीप वराळ पाटील यांच्या प्रयत्नातून  प्राथमिक आरोग्य उपकेंद्र राळेगण थेरपाळ येथे प्रसूतीगृह बांधकाम करणे व परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविणे - 8 लक्ष रुपये या कामाचे नुकतेच भूमिपूजन सोहळा करण्यात आला.

      या कामाचा भूमिपूजन समारंभ संदीप वराळ पाटील जनसेवा फौंडेशनचे अध्यक्ष सचिनभाऊ वराळ पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य दिनेशदादा बाबर हे होते.


         तसेच कार्यक्रम प्रसंगी लोकनियुक्त सरपंच पंकजदादा कारखिले,उपसरपंच सौ.अलकाताई घावाटे,चेअरमन.अंकुशराव कारखिले,व्हा.चेअरमन दामुशेठ टकले,मा.चेअरमन भरतनाना शितोळे,मा.उपसरपंच योगेश आढाव,ग्रामपंचायत सदस्य माऊली शितोळे,किरण बाळासाहेब कारखिले,नरेश सोनवणे,अनिताताई मोरे,मंगेश कार्ले,सोसायटी संचालक शशिभाऊ कारखिले,सुखदेव कारखिले,पोपट काणे,रामदास काणे,दत्तात्रय कारखिले, सर्जेराव बेंडाले,पांडुरंग बेंडाले,नानाभाऊ कारखिले,प्रसाद शितोळे,बाळा कार्ले,नामदेव घुले,अक्षय इचके,रवीदादा कारखिले,पप्पू कार्ले,दिनेश कारखिले,रमेश कारखिले,संतोष वाढवणे,विश्वनाथ लामखडे, गंगाराम बेंडाले,गणेश गाडीलकर,बाळू बेंडाले,राहुल मोरे,जयसिंग बेंडाले,कैलास कारखिले,बाजीराव शेवकर,राजू लोंढे,दादाभाऊ बेंडाले,विठोबा शेवकर,तुकाराम पवार,संदीप घावटे,अतुल मोरे,अजय जगदाळे,राजू लोंढे,तसेच आरोग्य उपकेंद्रातील सर्व अधिकारी-कर्मचारी वर्ग ठेकेदार इंजि.अमीर शेख आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments