पारनेर प्रतिनिधी
गेल्या अनेक दिवसांपासून राळेगण थेरपाळ, जवळा, पठारवाडी, निघोज, देवीभोयरे, लोणी मावळा, अळकुटी या परिसरातील शेती, ओढे या पाणीसाठ्यांमध्ये सुपा व रांजणगाव गणपती या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील काही कंपन्यांमधील वेस्ट, केमीकल, हानीकारक पदार्थ नाशिकला जात असताना या परिसरात सोडतात. त्यामुळे या परिसरातील जमिनी नापीक होण्याकडे वाटचाल होत आहे. पाणीसाठे दूषित होऊन आजाराचे प्रमाण वाढले आहे. पत्रकारांनी वेळोवेळी या विषयावर आवाज उठवून ही प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारे शेतकरी बांधवाना ञास होऊ नये व संबंधित कंपनीला नोटीस देऊन कारवाई करावी यासाठी पारनेर तहसिलदार यांना उद्या दिनांक १० नोव्हेंबर रोजी निवेदन देण्यात येणार आहे व योग्य ती कारवाई न झाल्यास तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल अशी माहिती राळेगण थेरपाळ गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच पंकजदादा कारखिले यांनी दिली.

0 Comments