देशासाठी बलिदान देणार्या शहीद जवानांच्या स्मृती कायम ठेवण्यासाठी म्हसणे फाट्याला शहीद जवान फाटा नामकरण करुन त्या ठिकाणी पारनेर तालुक्यातील सर्व शहीद जवानांची प्रतिमा असणारी मोठी कमान परिसरातील कंपण्यांच्या सहकार्याबरोबर छोट्या मोठ्या उद्योजकांसमोर लवकरच प्रस्ताव मांडुन लोकसभाग व श्रमदानातुन पारनेर तालुक्यातील आजी माजी सैनिकांसह विविध दानशुरांच्या माध्यमातुन कमान उभारणीसाठी पाठपुरावा करु - शरद पवळे (सामाजिक कार्यकर्ते)पारनेर
पारनेर तालुक्यातील नगर~पुणे महामार्गावरील नारायणगव्हाणमधील सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे व सचिन शेळके यांनी गेल्या १०ते १२ वर्षांपासुन नारायणगव्हाणमधील गोरगरिब गरजुंना मिठाई बरोबर जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केले असुन गेल्या वर्षी सुप्यातील पालावर असणार्या गोरगरींबासह वन्य प्राण्यांना फळे बिस्कीटांचे वाटप केले होते. यावर्षी वडनेर हवेली येथिल शहीद जवान अरुण कुटे यांच्या स्मारकामध्ये शहीद जवान अरुण कुटे व नारायणगव्हाणचे शहीद जवान दत्तात्रय कांडेकर यांचे माता पिता यांचे आशिर्वाद घेत दिपावलीचे अवचित्य साधत वडनेर हवेलीचे ह.भ.प. माऊली बाबा यांच्या हस्ते व सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे व सचिन शेळके यांनी दोन्ही परिवाराचा सन्मान करत ,दिवाळी भेट देवुन समाजासमोर शहीद जवानाच्या परिवाराप्रती आपलेपणाची भावना यातुन घट्ट करत, भविष्यात शहिद परिवाराच्या प्रश्नांसह माजी सैनिकांच्या विविध समस्या निवारणासाठी पुढाकार घेणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यावेळी सांगितले. त्याचबरोबर सचिन शेळके यांनी अमर जवान अरुण कुटेंच्या स्मारकाप्रमाणे शहीदांच्या स्मृती आठवणीत ठेवण्यासाठी नारायणगव्हाणमध्ये शहीद जवानांचे भव्य दिव्य स्मारक लोकसहभाग व श्रमदानातुन उभारणार असल्याचे वृत्तपत्राशी बोलताना सांगितले.
![]() |
| वडनेर हवेलीमध्ये शाहिद जवानांच्या कुटुंबियांसमवेत दिवाळी साजरी करताना सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे व सचिन शेळके. |

0 Comments