अन्यथा नाशिक विभागीय आयुक्तांच्या कार्यालयासमोर उपोषण
अन्याय निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांचा इशारा
पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील विविध ग्रामपंचायत स्थरावरील प्रलंबित प्रश्न व भ्रष्टाचार बाबत जिल्हा परिषद व पंचायत समिती पारनेर यांच्याकडे तक्रार करून पाठपुरावा देखील केला आहे. अनेकदा तक्रारी करून देखील संबंधितांवर कारवाई केली जात नाही तरी कारवाईस करण्यास टाळाटाळ करणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी अन्यथा नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयासमोर २४ नोव्हेंबर रोजी उपोषण करण्यात येईल असा इशारा मुख्य सचिव मंत्रालय यांना निवेदनाद्वारे अन्याय निर्मूलन सेवा समितीच्या वतीने जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी दिला आहे.
पारनेर तालुक्यातील अनेक गावांतील प्रलंबित प्रश्नांवर, अन्याय ग्रस्तांच्या समस्यांवर अन्याय निर्मूलन सेवा समितीच्या वतीने आंदोलन करून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. तालुक्यातील अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे आम्ही जनतेच्या व शासनाच्या समोर उघड केली असून अनेक प्रकरणांत अनेक जण दोशी आढळून आल्याचा व त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा चौकशी अहवाल देखील आहे. काही प्रकरणांची आम्ही चौकशीची मागणी केली आहे. चौकशी अंती अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येणार आहेत. विविध गावांच्या शासकीय कामांची चौकशी प्रलंबित आहेत. या सर्व गोष्टींची चौकशी करावी, दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी गेल्या दीड ते दोन वर्षांपासून आम्ही अन्याय निर्मूलन सेवा समितीच्या वतीने जिल्हा परिषद अहमदनगर व पारनेर पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी पत्रे, स्मरणपत्रे देऊन समोर भेट घेऊन दोषींवर कारवाई करून प्रलंबित चौकशी करण्याची मागणी केली आहे. परंतु प्रशासकीय अधिकारी गांभीर्याने न घेता प्रत्येकवेळी टोलवाटोलवी ची उत्तरे देऊन कारवाईस व चौकशी करण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे हे प्रशासकीय अधिकारी त्यांच्या कामाची जबाबदारी व्यवस्थित पार पाडत नसून संबंधित दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अन्यथा नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयासमोर २४ नोव्हेंबर पासून अन्याय निर्मूलन सेवा समितीच्या वतीने उपोषण करण्यात येईल असा इशारा अन्याय निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिवांना निवेदनाद्वारे दिला आहे.

0 Comments