ग्रंथालय सेनेच्या वतीने नायब तहसीलदारांना निवेदन
पारनेर
शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयीन कर्मचारी यांना कोविड १९, कोरोना महामारी एप्रिल २०२० ते सप्टेंबर २०२० कालावधीचा दुप्पट पगार देण्यासाठी २०२०-२१ (वेतनेतर) ग्रंथखरेदी मंजूर निधी वेतनावर खर्च करण्यासाठी विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात यावी या मागणीसाठी प्र.महाराष्ट्र ग्रंथालय सेनेच्या वतीने नायब तहसीलदार अविनाश रणदिवे यांना निवेदन देण्यात आले.
अवघ्या तुटपुंज्या मानधनावर काम करत असणाऱ्या ग्रंथालयीन कर्मचारी गेल्या ६ महिन्यापासून ग्रंथालये कोरोना मुळे बंद आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. काही ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे आर्थिक अडचणीमुळे काहींचा मृत्यू देखील झाला आहे. त्यांच्या वारसांना आर्थिक मदत मिळावी. कर्मचाऱ्यांना वेतन दुप्पट देण्यासाठी २०२०-२१ मधील ग्रंथखरेदी चा निधी वेतनावर खर्च करता येऊ शकतो त्यासाठी विशेष बाब म्हणून परवानगी मिळण्यात यावी या मागणीसाठी पारनेर चे नायब तहसीलदार अविनाश रणदिवे यांना प्र महाराष्ट्र ग्रंथालय सेना यांच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी दीपक बोरुडे, ऍड जगदीश शिंदे, शशिकांत झंझाड, गंगाधर रेपाळे, प्रदीप खोसे आदी उपस्थित होते.

0 Comments