शिव पाणंद रस्ते खुले करण्यासाठी राज्यात ऐतिहासिक लढा उभारणार - शरद पवळे
सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे
पारनेर- चंद्रकांत कदम
पारनेर तालुक्यातील सर्व शिव पाणंद रस्ते खुले करून घ्यावेत अन्यथा या रस्त्यांसाठी राज्यातील मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा पारनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.
पारनेर तालुक्यात शिव पाणंद रस्ते नवनिर्माण कृती समितीच्या माध्यमातुन प्रत्येक महिन्याच्या पहील्या शनिवारी पारनेर तहसिलवर काळे दिवस साजरे करुन चळवळीला व्यापक बनवण्यात आले त्यामुळे काही भागात शिव पाणंद रस्ते खुले करण्यासाठी शेतकर्यांनी सहकार्यही दाखवले त्यामुळे चळवळीला यश यायला सुरुवात झाली व शेतकर्यांचे तंटेही मिटु लागले परंतु पारनेर तालुक्यातील काही गावातील शिव रस्ते अजुनही खुले नाहीत त्याचबरोबर दिवसेंदिवस शेतीची होणारी तुकडेवारी शेतकर्यांच्या संघर्षात आगीचे तेल ओतण्यासारखी झाली असुन गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकरी हवालदिल झाले असुन अनेकांचे तंटे कोर्टोत चालु असुन या सर्वांना न्याय देण्यासाठी शिवपाणंद रस्त्यांच्या चळवळीला जनजागृती करुन राज्यव्यापी स्वरुप देवुन पारनेरसह राज्यातील सर्व शिव पाणंद रस्ते खुले होत नाही तोपर्यंत लढा चालु ठेवणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी वृत्तपत्रांशी बोलताना व्यक्त केले.
शिव पाणंद रस्त्यांच्या चळवळीला व्यापक करुन शेतकर्यांना संघर्षमुक्त करण्यासाठी सरकारला प्रशासणाला शिव पाणंद रस्ते खुले करायला भाग पाडू- शरद पवळे (सामाजिक कार्यकर्ते)
0 Comments