निट परीक्षा उत्तीर्ण पायल सोबले हिचा राज्य मराठी पत्रकारसंघाचे वतीने सन्मान..

पायलला व्हायचंय डॉक्टर........यशामध्ये शिक्षक व आईवडिलांचे श्रेय

(पारनेर तालुका प्रतिनिधी) : -

 पारनेर तालुक्यामधील सोबलेवाडी येथील मेजर सावजी भास्कर सोबले यांची सुकन्या कु.पायल सावजी सोबले हिने निट परीक्षेमधे ६४१ गुण मिळवुन उत्तीर्ण झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने सोबलेवाडीमधे तिचा सत्कार करण्यात आला.यावेळी कवी देवा झिंजाड लिखीत सगळच उलथुन टाकलंय हे पुस्तक,शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देवुन,तिच्या तोंडामधे पेढा भरवत कु. पायल हिचा पत्रकार संघाचे पारनेर तालुका अध्यक्ष दत्ता गाडगे यांचे शुभहस्ते व सर्व पत्रकारांचे उपस्थितीमधे सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना अध्यक्ष दत्ता गाडगे म्हणाले, पारनेर तालुका हि रत्नांची खाण आहे आणि कु.पायल हे त्याच खाणीतील एक रत्न आहे.अशा रत्नाची पारख राज्य मराठी पत्रकारसंघाने केली असुन,तिला मार्गदर्शन करणारे गुरुजन,आईवडील यांचेही त्यांनी आभार मानले.पायलने यशाची अनेक शिखरे गाठावित असे बोलताना त्यांनी भावि यशासाठी तिला भरभरुन शुभेच्छाही दिल्या. यापूर्वीही पत्रकार संघाच्या संघटनेने अनेक स्तुत्य उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगीतले.सोबले वाडीमधे पत्रकार संघाचे वतीने काही दिवसापूर्वी वृक्षारोपण आणि पत्रकारांना रेनकोटचे वाटप केल्याचे त्यांनी सांगीतले.भविष्यामधेही अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा संघटनेचा मनोदय असल्याचे गाडगे यांनी सांगीतले.सत्कारमूर्ती पायल हिने प्रतिक्रिया देताना गुरुजन व आईवडीलांना या यशाचे श्रेय दिले.पुढे जावुन डाॅक्टर होण्याचा मनोदय असल्याचे पायलने बोलून दाखवले.



छायाचित्रामधे कु.पायलचा सत्कार करताना पत्रकारसंघाचे अध्यक्ष दत्ता गाडगे,उपस्थित सर्व पत्रकार व ग्रामस्थ. छाया - चंद्रकांत कदम

   यावेळी संघटनेचे पारनेर शहर अध्यक्ष संतोष सोबले,उपाध्यक्ष विनोद गायकवाड,संपर्कप्रमुख संजय मोरे,उपसचिव बाबाजी वाघमारे, पत्रकार सागर आतकर,आनंदा भुकन,चंद्रकांत कदम, विजय रासकर,गंगाधर धावडे,आदी पत्रकार तसेच ग्रामस्थही उपस्थित होते.प्रास्ताविक उपाध्यक्ष विनोद गायकवाड यांनी तर आभार निघोज शहराध्यक्ष सागर आतकर यांनी मानले.


Post a Comment

0 Comments