ग्रामपंचायत लेटर पॅडचा दुरुपयोग करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा - मनसेची मागणी

 



सुपा : किरण थोरात 


अज्ञात व्यक्तीने सुपा ग्रामपंचायत चे बनावट लेटर पॅड तयार करून  दुरुपयोग करुन रयत शिक्षण संस्था , सातारा येथे काळे सर यांच्या बदली संदर्भात एक ठराव दिला आहे व तो बनावट आहे , ग्रामपंचायतच्या लेटर पॅडचा असा दुरुपयोग होत आहे  ही फार मोठी गंभीर बाब आहे,  तर याबाबत सुपा ग्रामपंचायत ने  काय कारवाई केली ?  असा प्रश्न  मनसेने उपस्थित केला आहे , 

    सविस्तर माहिती अशी की पारनेर तालुक्यातील  सुपा येथील न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य श्री . संपतराव गुलाब काळे यांची बदली होण्यासाठी ग्रामपंचायतच्या लेटरपॅडचा दुरुपयोग करून रयत शिक्षण संस्थेचे सातारा येथील कार्यालयास अज्ञात इसमाने ग्रामपंचायतच्या नावाने लेखी तक्रार अर्ज केलेला आहे . ग्रामपंचायत च्या  मासिक सभेत याबाबत चर्चा झाली असता सदरचा तक्रार अर्ज खोटा असून ग्रामपंचायतने कुठल्याही प्रकारचा अर्ज केलेला नाही असे सभेच्या निदर्शनास आले . त्यामुळे प्राचार्य श्री . संपतराव गुलाब काळे यांचे काम अतिशय चांगले असल्याने त्यांची सुपा येथून बदली होऊ नये असे ग्रामपंचायत च्या मासिक सभेत सर्वानुमते ठरले ..

ग्रामपंचायत लेटर हेड चा दुरुपयोग केल्यानंतर. सुपा ग्रामपंचायत ने मासिक मीटिंग मध्ये चर्चा करून प्राचार्य यांची बदली करण्यात येऊ नये. याबाबत ठराव घेण्यात आला.

     या बनावट लेटर पॅड संदर्भात दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ग्रामपंचायत सुपा यांना  निवेदन देण्यात आले,  ज्याने असे ग्रामपंचायतच्या लेटरपॅडचा दुरुपयोग केला आहे त्याची सखोल  चौकशी करून जर १० दिवसात तुम्ही याचा शोध घेऊन कारवाई केली नाही तर ११ व्या दिवशी ग्रामपंचायत समोर मनसे स्टाईलने मोठे आंदोलन करण्यात येईल व याला सर्वस्वी ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी . असे निवेदन  सरपंच  व ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत कार्यालय यांना  तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार, मनसे सुपा शाखा अध्यक्ष अक्षय सूर्यवंशी,  उपाध्यक्ष संदीप चव्हाण यांनी दिले आहे.



Post a Comment

0 Comments