स्थानिकांचा इशारा....
सुपा प्रतिनिधी किरण थोरात
पारनेर तालुक्यातील आपधुप येथील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहन करण्यापूर्वी स्थानिकांना कामे व कॉन्ट्रॅक्ट मिळतील असे आश्वासन दिले होते परंतु जमिनी अधिग्रहण फोन कंपनी चालू झाल्यानंतर स्थानिकांना कोणत्याही प्रकारे कामे, कॉन्ट्रॅक्ट मिळत नसल्याने शेतकऱ्यांना विविध प्रकारे संकटांना सामोरे जावे लागत आहे, यामध्ये अनेक शेतकरी कर्जबाजारी आहेत, तरुणांना नोकऱ्या नाहीत, हे असताना त्यात कोरोना आजाराने संपूर्ण जगभर धुमाकूळ घातला आहे त्यामुळे कोणत्याही तरुणांच्या हाताला काम नाही, त्याचा संताप व्यक्त करत ग्रामस्थांनी स्थानिकांना कामे द्या अन्यथा गेट बंद आंदोलनाला सामोरे जावे लागेल असा इशाराच दिला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मौजे आपधुप गावामध्ये एम . आय . डी . सी . भुखंडामधील संपूर्ण जमिनीला शिक्के पडले असता , आपधुप गावाने विरोध दर्शविला असता स्वतः तात्कालीन प्रांतधिकारी व एम . आय . डी . सी . प्रशासकीय अधिकारी यांनी शब्द दिला की , आपधुप गावामधल्या जे काही जमिनी दिल्यानंतर ज्यांची जमिन एम . आय . डी . सी . मध्ये गेली आहे त्या पैकी प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला कंपनीमध्ये कंपनी कायमस्वरूपी बेसिस वरती घेण्यात येईल . व आपधुप शिवारामध्ये जेवढ्या कंपन्या झाल्या आहे त्या मध्ये आपधुप येथील तरुणांना प्रथम प्राधान्य ( संधी ) देण्यात येईल . असे अश्वासन करण्यात आले होते . तरी यु . नो . मिण्डा हि कंपनी आपधुप शिवारामध्ये चालू झाली असून स्थानिकांना कोणतेही स्थान दिले जात नसून व वेळोवेळी कंपनीचे एच : आर . श्री . उल्हास नेवाळे साहेब यांची जवळपास २५ ते ३० वेळा भेट घेतली असून साहेबांनी केवळ बोगस अश्वासन देऊन अद्याप लेबर कॉन्ट्रॅक्ट , टुरिस्ट , हाऊस किपींग , बस , ट्रॅव्हल्स ट्रान्सपोर्ट , या पैकी एकही कामे आपधुप मध्ये न दिल्यामुळे में आपधुप मधील जमिन अधिग्रहन केल्यामुळे आपधुप येथील तरुणांना रोजगार उपलब्ध नसल्यामुळे तरुण बेरोजगार झाले आहेत . तरी आपधुप गावामधील तरुणांना कंपनीमध्ये मुलांना कंपनी तर्फे कायम स्वरूपी कामे मिळावेत व लेबर कॉन्ट्रॅक्ट इतर सर्व कॉन्ट्रक्ट चे प्राधान्य आपधुप गावातील तरुणांना प्रथम मिळावे व अर्जाची दखल घेण्यात यावी न घेतल्यास गेट बंद अंदोलन सोमवार दि . २१ सप्टेंबर रोजी य . नो . मिंडा कंपनी च्या गेट वरती मागण्या मान्य न होईपर्यंत गेट बंद अंदोलन करण्यात येईल याची दखल घ्यावी . यावेळी निवेदन देताना तंटामुक्तीचे अध्यक्ष संतोष गवळी, पुष्पराज गवळी, शरद गवळी, गणेश गवळी, गौरव गवळी, अर्जुन चव्हाण, निलेश गवळी, किशोर गवळी, बापू गवळी, दीपक गवळी, पोपट चव्हाण, सुरज गावडे, सागर गवळी, शरद पवार व अपधुप ग्रामस्थ उपस्थित होते.

0 Comments