माझे कुटूंब माझी जबाबदारी ला निघोज गणात सुरुवात

 

टाकळी ढोकेश्वर :



कोव्हीड 19 नियंत्रणासाठी तसेच मृत्यु दर कमी करण्यासाठी दि.15 सप्टेंबर 2020 पासुन राज्यात *माझे कुटूंब माझी जबाबदारी*  कोव्हीड मुक्त महाराष्ट्र ही योजना  राज्य सरकार महाराष्ट्रात राबवत असुन सदरची योजना शासकिय अधिकारी/ कर्मचारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे सहकार्याने राबविण्याचे सरकारचे आदेश आहेत. त्याअनुषंगाने दिनेश बाबर यांनी  निघोज पंचायत समिती गणात  माझा गण माझे कुटूंब माझी जबाबदारी  या योजनेच्या अंमलबजावणीची सुरुवात करताना वडनेर बु.येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात मी स्वत: माझे शरिराचे तापमान व ऑक्सीजनची पातळी चेक करुन घेतली.  आणि पुढे   गणातील सर्व लोकांचे  तापमान व ऑक्सीजनची पातळी चेक करण्यासाठी सुरुवात केली. 

  यावेळी प्रशासक पी.एस.यादव, ग्रामसेवक हरिश्चंद्र काळे, जालींदर मोहिते सर, शिवाजी पवार, आरोग्य सेविका शेख मँडम उपस्थित होत्या. निघोज पंचायत समिती गणातील सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण शासकिय यंत्रनेला सहकार्य करुन आपली व आपल्या कुटूंबाची तपासणी करुण घ्यावी.

घरीच रहा स्वत:ला व कुटूंबाला कोरोना पासुन दुर ठेवा. असे आव्हान पारनेर तालुक्यातील सर्व नागरिकांना पंचायत समितीचे सदस्य दिनेश बाबर यांनी  केले आहे. 



Post a Comment

0 Comments