सरपंच ठकाराम लंके यांनी निघोजला विकास कामांचा डोंगर उभा केला;आ.निलेश लंके




निघोज मध्ये सव्वा कोटींच्या विकास कामांची उद्घघाटने-

निघोज प्रतिनिधी
आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात निघोज गावातील अनेक विकास कामांच्या माध्यमातून सरपंच ठकाराम लंके यांनी विकास कामांचा डोंगर उभा केला असे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी केले.
निघोज(ता.पारनेर)येथिल विविध विकास कामांच्या उद्घघाटन प्रसंगी पारनेर-नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार लोकनेते निलेश लंके,सरपंच ठकाराम लंके,निघोज नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत कवाद,माजी सभापती सुदामरावजी पवार,वनकुटेचे लोकनियुक्त सरपंच अॅड राहुल झावरे,भिमाशेठ घुले,पांडूरग कृपा पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत लंके,राष्ट्रवादिचे नेते सोमनाथ वरखडे,युवा नेते अरुण पवार,माजी चेअरमण अशोकराव ढवळे,उपसरपंच बाबाजी लंके,ग्रामपंचायत सदस्य,सदस्या,विविध संस्थाचे पदाधिकारी,गावातील ग्रामस्थआदि. 

   रविवार (दि.१३)रोजी निघोज(ता.पारनेर)येथे वडगाव गुंड,शिरसुले,लाळगे मळा,निघोज गावठाण, साळवे वस्ती,शिवडी-लामखडे वस्ती,तनपुरेवाडी व इतर प्राथमिक शाळेच्या आवारात पेव्हींग ब्लॉक बसविणे,तुकाई मळा ते बोदगेवाडी,कुंडरोड ते पांढरकर वाडी,गावातील मज्जीद ते सोसायटि,कुंडठाकर वस्ती सभा मंडप,येथिल रस्ता काँक्रींटिकरण,ड्रेनेज लाईन,अशा विविध सुमारे सव्वा कोटी रु खर्चाच्या विकासकामांचे उदघाटन व लोकार्पण सोहळा आमदार निलेश लंके यांच्या हस्ते पार पडला.
      या वेळी बोलतांना आ लंके म्हणाले की,संपूर्ण राज्याने आदर्श घ्यावा असे "ऑनलाईन शिक्षण" पुढे आणले,तरुण युवकांना पोलीस भरती प्रशिक्षणा साठी "पोलीसखाकी मोबाईल अॅप"आनले.कोरोनाच्या लॉक डाउन च्या काळातही तालुक्यात गेली अनेक वर्षे राखडलेली विकास कामे मार्गी लावली,जनतेची कामे करण्यासाठी 'पर्सनॅलिटी' ची नाही तर 'पॉझिटिव्ह एनर्जी'ची गरज आहे असे उद्धगार आमदार लंके यांनी काढले.
     यावेळी सरपंच ठकाराम लंके बोलतांना म्हणांले की कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लोकांनी काळजी घ्यावी,आपण लोकांच्या सेवेसाठी यापुढे ही बांधील आहोत,पाच वर्ष लोकांनी आपल्याला भरभरून प्रेम व साथ दिली,त्याची परतफेड आपण यापुढिल काळात सदैव करत  राहणांर असल्याची ग्वाही उपस्थितांना दिली.
यावेळी जेष्ठ नेते प्रभाकरशेठ कवाद,कन्हैया उद्योग समुहाचे अध्यक्ष शांताराम लंके,निघोज नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत कवाद,माजी सभापती सुदामरावजी पवार,वनकुटेचे लोकनियुक्त सरपंच अॅड राहुल झावरे,प्रसिद्ध कांदा व्यापारी भिमाशेठ घुले,पांडूरग कृपा पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत लंके,
राष्ट्रवादिचे नेते सोमनाथ वरखडे,युवा नेते अरुण पवार,माजी चेअरमण अशोकराव ढवळे,उपसरपंच बाबाजी लंके,ग्रामपंचायत सदस्य,सदस्या,विविध संस्थाचे पदाधिकारी,गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


"पंधरा वर्षात जेवढि विकास कामे झाली नाही,ति येत्या पाच वर्षात मार्गी लागलेली असतील,मात्र सध्या तालुक्यातील जनतेला कोरोना महामारीच्या संकटात मदत करणे महत्वाचे आहे,"तालुक्याच्या विकासाचा ८५ कोटी रुपायचा मास्टर प्लॅन तयार आहे"त्याच पद्धतीने तालुक्यात ग्रामविकासाची संकल्पना राबवून "राज्यात आदर्शवत असा रोल मॉडेल म्हणून आपला तालुका ओळखला जाईल".
आमदार,निलेश लंके


गावाने पाच वर्षे सरपंच म्हणून काम करण्यांची संधी दिली,ग्रामस्थांनी पाच वर्षाच्या कारभारात सदैव सहकार्य केले.घेतलेल्या अनेक निर्णयांना पाठबळ दिले.विशेष म्हणजे पाच वर्षात राजकारण करत असतांना अनेक वेळा त्रासही सहन केला,
भविष्यातही गावाच्या भल्यासाठी आपण कायम तप्तर राहू.
सरपंच.ठकाराम लंके

Post a Comment

0 Comments