पारनेर
पारनेर तालुका सैनिक बँकेतील अधिकारी व संचालक मंडळ आर्थिक अपहार केलेप्रकरणी यांच्यावर पोलिस प्रशासनाकडून कारवाईसाठी टाळाटाळ होत असून त्यांच्यावर १५ दिवसांत गुन्हे दाखल करून कारवाई करावी अन्यथा ६ ऑक्टोबर रोजी अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालया समोर अन्याय ग्रस्तांसमवेत उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा अन्याय निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी दिला आहे.
पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेतील भ्रष्टाचार विरोधात तसेच कर्मचारी वर आत्महत्या करण्याची वेळ आणणाऱ्या चेअरमन व मुख्यकार्यकारी अधिकारी यांचेवर कारवाई करणेसाठी व त्या १० कर्मचाऱ्यांचे जबाब घेण्यात यावेत. अन्यथा दिनांक ६/१०/२०२० रोजी जिल्हा पोलिस कार्यालयासमोर करण्यात येईल असा इशारा तक्रारदार व अन्याय निर्मूलन सेवा समितीच्या वतीने देण्यात आला आहे.

0 Comments