गहिनीनाथ रसाळ यांची निमगाव भोगीच्या सेवा संस्थेच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड


शिरूर 
शिरूर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या निमगाव भोगी गावच्या सेवा संस्थेची अध्यक्षपदाची निवडणूक बुधवारी (९) रोजी पार पडली. यामध्ये संचालक गहिनीनाथ बाबा रसाळ यांची सर्वानुमते चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली.

      तत्कालीन अध्यक्षांचा कार्यकाळ समाप्त झाल्याने बुधवारी दि ९ रोजी संस्थेच्या सभागृहामध्ये अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेत शासनाच्या आदेशाचे पालन करत सर्व संचालक यांनी मास्क व सनिटायझर वापर करत शासकीय नियमांचे काटेकोर पालन करत ही निवड प्रक्रिया पार पडली. सर्व संचालकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये गहिनीनाथ रसाळ यांच्या नावावर चेअरमन पदासाठी एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले. संस्थेच्या सभागृहामध्ये ही निवड करण्यात आली. चेअरमन पदासाठी गहिनीनाथ रसाळ यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी रसाळ यांची सण २०२०- २०२१ या वर्षासाठी चेअरमन पदी निवड घोषित केली. 
    अध्यासी अधिकारी ग.द. पुंड यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडली. यावेळी संचालक सोनबा सांबारे,बापू जाधव, उत्तम व्यवहारे, धर्माजी रासकर, विठोबा शेवाळे, विजय असवले, पोपट रासकर, भाऊसाहेब जाधव, नामदेव पावशे, लक्ष्मण बढे, उर्मिला फलके, सुशीला रासकर आदी संचालक उपस्थित होते. 

सभासदांच्या हिताचे काम करणार - रसाळ सर्व संचालक व सभासदांनी विश्वास ठेऊन मला चेअरमन पदी काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. सर्व संचालकांना विश्वासात घेऊन सभासदांच्या हिताचे काम करणार असल्याचे निमगाव भोगी सेवा संस्थेचे नवनिर्वाचित चेअरमन अध्यक्ष गहिनीनाथ रसाळ यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments