पारनेर,
पारनेर तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची हेळसांड त्वरित थांबवावी अन्यथा शिवबा संघटना याबाबत रस्त्यावर उतरेल अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे शिवबा संघटना/प्रहार जनशक्ती पक्ष यांच्यावतीने इमेल द्वारे करण्यात आली होती. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तातडीने दखल घेतली असून जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांना चौकशी करून उचित कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालय कडून आपत्ती व्यवस्थापन समितीच्या नोडल अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
देशावर जसे कोरेना चे संकट आहे तसे पारनेर तालुक्यातील जनतेवरहि आले आहे. जनता मोठ्या धैर्याने त्याचा सामना करत आहे. परंतु आरोग्य यंत्रणेच्या चुकिच्या धोरणामुळे अनेक जिव जात आहे. याला जबाबदार कोण? प्रशासन कोविड रुग्ण सापडला कि सरकारी दवाखाना किंवा कोविड सेंटर मध्ये भरती करत व नंतर त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जाते. त्याच्या आरोग्याकडे लक्ष दिले जात नाहि. आरोग्य विभाग व अधिकारी पुन्हा फिरकतहि नाहि. पेशेंट च्या आरोग्याची रोजची अपडेट यांच्याकडे नसते. रुग्णास काहि त्रास होतोय का याकडे मात्र दुर्लक्ष केले जाते.अशा या यंत्रणेच्या चुकीमुळे गोरगरीब जनतेचा बळी जात आहे. नगर सिव्हिल मधील पारनेर च्या रुग्णाचा जिव गेला, कुटुंबप्रमुख गेल्यानंतर कुटुंबाची काय आवस्था होते. याला जबाबदार आरोग्य यंत्रणा आहे. पारनेर मधील स्थानिक आरोग्य यंत्रणा हि सहकार्य करत नसल्याचे अनेक प्रकार आहे. यावर कार्यवाही व्हायलाच हवी जेणेकरून पुन्हा असे प्रकार व्हायला नको. यासंदर्भात शीवबा संघटना कडून निवेदन मा. मुख्यमंत्री,मा.राजेशजी टोपे आरोग्यमंत्री, पालकमंत्री मा. हसन मुश्रीफ साहेब,राज्यमंत्री मा.बच्चूभाऊ कडु, खासदार मा. सुजयदादा विखे, आमदार निलेशजी लंके, प्रधान सचिव आरोग्यविभाग डॉ. प्रदीपकुमार व्यास,जिल्हाअधिकारी अहमदनगर,तहसीलदार पारनेर याना मेलच्या माध्यमातून करण्यात आली होती.
यावर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तातडीने दखल घेतली गेली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक व पारनेर तहसीलदार यांना चौकशी करून उचित कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालय कडून आपत्ती व्यवस्थापन समितीच्या नोडल अधिकाऱ्यांनी दिले आहेत. यावर काय कार्यवाही होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
गोरगरीब रुग्णांची हेळसांड थांबवावी - शेटेकोरोना काळात पारनेर तालुक्यातील गोरगरीब रुग्णांवर उपचार व्यवस्थित होत नसून रुग्णांची हेळसांड होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. रुग्णांची हेळसांड थांबून सर्वांवर व्यवस्थित उपचार व्हावेत यासाठी शिवबा संघटना व प्रहार जनशक्ती पक्ष लक्ष घालून आहे. रुग्णांवर व्यवस्थित उपचार होण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरण्याची देखील तयारी असल्याचे शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे यांनी सांगितले.



0 Comments