तिखोल मध्ये पावसाने घर पडले ; निलेश लंके प्रतिष्ठान विद्यार्थी सेनेची मदत

"युवकांनी या कोरोनाच्या संकटात समाजाचा आधार व्हावा-संकेत कावरे"

टाकळी ढोकेश्वर: 
  प्रतिनिधी किरण अनिल थोरात

महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पाऊस चालू आहे या पावसात सगळीकडेचमोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहेत तसेच पारनेर तालुक्यातील तिखोल मधील एक घर पडले आहे . तिखोल येथील नाना शिवराम ठाणगे  यांच्या मालकीचे हे घर होते . सतत पडत असलेल्या पावसाचे पाणी भिंतीमध्ये झिरपल्याने घराच्या भिंती कमकूवत होवून हे घर कोसळले . या घरात १ कुटूंब राहत होते  . सुदैवाने घरात राहणाऱ्या कोणालाही दुखापत झाली नसली तरी घरातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,  व  ठाणगे यांच्या छोटया मुलीला किरकोळ दुखापत झाली आहे . प्रसंगावधान राखून शेजाऱ्यांनी घरातील माणसांना बाहेर काढले . बुधवारी दि .१९ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली .

     तिखोल गावचे उपसरपंच शैलाताई नबाजी ठाणगे यांनी लवकरात लवकर पंचनामा करुन घ्या असे ग्रामसेवक,  तलाठी यांना सांगितले . शैलाताई नबाजी ठाणगे तसेच निलेश लंके प्रतिष्ठान विद्यार्थी सेना प्रमूख संकेत भैय्या कावरे यांनी त्या कुटूंबाला तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था व्हावी म्हणुन घरावर टाकण्यासाठी ताडपत्री देऊन मदत केली आहे. तिखोलकरांनो अडचणीच्या काळात नेहमी उभे राहु असे शैलाताईनी सांगितले. युवकांनी या कोरोनाच्या संकटात समाजाचा आधार व्हावा असे निलेश लंके प्रतिष्ठान विद्यार्थी सेना प्रमुख संकेत भैय्या कावरे यांनी तरुणांना आव्हान केले.


Post a Comment

0 Comments