समीतीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्रदादा जाधव यांनी केले समाज बांधवांना मार्गदर्शन
कोपरगाव :प्रतिनिधी -किरण थोरात
अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथे अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर व पदग्रहण सभारंभ संपन्न झाला. त्यावेळी समिती मधील काम करणारे सर्व धर्मीय समाज बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाला नगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील व ग्रामीण भागातील सर्व पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. अन्याय अत्याचार निर्मूलन समिती संस्थापक अध्यक्ष मा.रविंद्र दादा जाधव ह्या सभारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. सभारंभाचे प्रास्ताविक समितीच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ.रमादेवी धीवर यांनी केले. यावेळी एखाद्या समाजातील व्यक्तीवर अन्याय झाल्यास अन्याय अत्याचार समितीची भुमिका काय असेल हे कार्यकर्त्याना समजावून सांगुन समितीच्या हिताचे अनेक विषयावर साधक बाधक सविस्तर चर्चा करण्यात आली. या वेळी वसंतराव वाघ, जसपालसिंग (टीकुभाई) कोहली, मनिषा म्हसदे, प्रदीप पगारे, शिला जाधव, रेखा जाधव यांनी आपले विचार मांडून सदर शिबिरास मार्गदर्शन केले.
सध्या लॉकडाऊन च्या काळामध्ये मागासवर्गीय समाज बांधवांवर फार मोठ्या प्रमाणात अन्याय व उपेक्षा होत आहे. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील अन्याय अत्याचार निर्मूलन समिती सनदशीर मार्गाने लढत असुन कुठल्याही जाती-धर्मातील अन्याय ग्रस्तव्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी समितीचे पदाधिकारी लोकशाही व सनदशीर मार्गाने अखेर पर्यंत लढत राहणार असल्याचे प्रतिपादन रविंद्र दादा जाधव यांनी केले.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी युवाजिल्हाध्यक्ष मा.निखील भोसले, मा.संजय गिरी उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष,महिला जिल्हाध्यक्ष सौ.रमादेवी धीवर मॅडम,सौ.वंदना म्हसे, सौ. शकुंतला तांबे, उपाध्यक्ष किरण जाधव,जानमोहम्मद शेख,मा.हमराज सय्यद,राहता व शिर्डी तालुक्यातील युवक समितीने विशेष प्रयत्न घेतले.
अतिशय शिस्तबध्द पध्दतीने हि बैठक पार पडली.
समितीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र दादा जाधव यांच्या हस्ते नवीन नियुक्ती झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र व पुष्पगुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. शेवटी राष्ट्रगीत घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

0 Comments