रोख ठोक न्यूज चंद्रकांत कदम
निघोज - शिरूर रस्त्यावर अनेक धोकादायक झाडे असून त्या झाडांनी रस्त्याला विळखा घातला असून पावसाळ्याच्या दिवसात झाडे रस्त्यावर कोसळत असून दुर्घटना घडण्याचे प्रकार होत आहेत. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष होत आहे. ही झाडे रस्त्याने ये जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवाशी बेतल्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग जागे होणार का ? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
बेल्हे - शिरूर रस्त्यावर राळेगण थेरपाळ गावानजीक रस्त्याच्या दुतर्फा जुनाट बाभळीची झाडे आहेत. त्यांनी रस्त्याला विळखा घातला आहे. गेल्या २०-२५ वर्षांपूर्वीची ही झाडे असून सध्या झाडाच्या फांद्या कुजलेल्या व वाळलेल्या आहेत. पावसाळ्याच्या दिवसात व वादळात ह्या झाडाच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडत आहेत. बेल्हे - शिरूर हा महामार्ग असून हा महामार्ग रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये व कल्याण, संगमनेर, नाशिक रस्त्याला जोडणारा एकमेव रस्ता असल्याने या रस्त्यावर वाहनांची वर्दळ जास्त असते. पावसाळ्यात व वादळात ह्या झाडाच्या फांद्या रस्त्यावर पडल्याने रस्त्याची वाहतूक बंद होत आहे. काही वेळेस येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर देखील या फांद्या पडल्या आहेत. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नाही. ही धोकादायक झाडे काढणे गरजेचे असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे पूर्णपणे दुलक्ष होत आहे.
नुकत्याच झालेल्या पावसात राळेगण परिसरात ह्या झाडाच्या फांद्या रस्त्यावर पडल्या होत्या. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नव्हती. झाडे पडल्याने रस्ता पूर्णपणे बंद झाल्याने तात्काळ राळेगण थेरपळचे सरपंच पंकज कारखिले यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन पडलेली धोकादायक झाडे तोडून बाजूला काढून रस्ता सुरळीत खुला करून दिला. अद्यापही या रस्त्यावर अनेक धोकादायक झाडे असून ती कधीही रस्त्यावर पडून अनर्थ घडू शकतो. त्यामुळे तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालून ही धोकादायक झाडे तोडण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
![]() |
| शिरूर - निघोज रस्त्यावर राळेगण थेरपाळ येथे रस्त्यावर असणारी धोकादायक झाडे.छाया - चंद्रकांत कदम |


0 Comments