पारनेर तालुका परिवर्तन संस्थेच्या लढ्याला यश
रोख ठोक न्यूज - चंद्रकांत कदम
निघोज - देवीभोयरे रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठाले खड्डे पडले असून अपघातांची संख्या वाढली आहे. याकडे पारनेर तालुका परिवर्तन संस्थेने लक्ष घालून रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करून या रस्त्याचे खड्डे बुजवण्याची मागणी केली होती. याला यश आले असून आज या शुक्रवारी या रस्त्याचे खड्डे बुजवण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रारंभ करण्यात आला आहे. परिवर्तन संस्थेच्या लढ्याला हे यश आले असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
देवीभोयरे (ता. पारनेर) ते निघोज रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. या खड्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत. हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा अन्यथा पारनेर परिवर्तन फाऊंडेशन कोर्टाचे दरवाजे थोठवावेल, असा इशारा फाऊंडेशनच्या सदस्यांनी पाच दिवसांपूर्वी दिला होता. त्यावेळी तेथील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून लाक्षणिक आंदोलन देखील परिवर्तन फाऊंडेशन सदस्यांनी केले होते. त्यानंतर तातडीने प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात आली असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ठेकेदाराला खड्डे बुजविण्याचे आदेश देण्यात आले आहे. शुक्रवारी दि. 10 देवीभोयरे परिसरातील रस्त्यावरील खड्डे बुजिण्यासाठी सुरुवात करण्यात आली आहे. पारनेर तालुका परिवर्तन फाऊंडेशन या संस्थेने याबाबत आवाज उठविल्या नंतर प्रशासनाने तातडीने दखल घेऊन काम सूरुकेल्याबद्दल देवीभोयरे, निघोज, वडगाव गुंड परिसरातील नागरिकांनी वा वाहनचालकांनी परिवर्तन फाऊंडेशन चे आभार मानले.
खड्डे बुजविण्याचे काम व्यवस्थित करा अन्यथा..ठेकेदाराकडून खड्डे बुजविण्याचे काम सुरू असताना फक्त मोठे खड्डे बुजविले जात असून बारीक खड्डे बुजवत नसल्याचे परिवर्तन सदस्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लालगीच ही बाब परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष सचिन भालेकर यांच्या कामावर घातली. त्यानंतर भालेकर यांनी संबंधित ठेकेदाराची फोनवरून चांगलीच कानउघाडणी केली. जनतेच्या पैशातून खड्डे बुजविण्याचे काम होत आहे. जनतेच्या पैशातून कामे उच्चप्रतीचे व्हावेत अन्यथा परिवर्तन संस्था हे खपवून घेणार नाही. त्यामुळे या कामाबाबत टाळाटाळ अथवा खड्डे बुजविण्याचे काम व्यवस्थित करा अन्यथा परिवर्तन फाऊंडेशन च्या पद्धतीने कार्यवाही करण्यात येईल असा इशारा पारनेर तालुका परिवर्तन फाऊंडेशन चे अध्यक्ष सचिन भालेकर यांनी दिल्यावर सर्व काम व्यवस्थित करून देऊ असे ठेकेदाराने सांगितले.

0 Comments