कर्जदारांना फसवणूकी प्रकरणी पारनेर सैनिक बँकेच्या अधिकारी व संचालक मंडळावर गुन्हे दाखल करा अन्यथा उपोषण

अन्याय निर्मूलन सेवा समितीचा सहकार आयुक्तांना इशारा.
पारनेर 
              बोगस कागदपत्रे तयार करून कर्जदारांची जमीन बेकायदेशिर विक्री करून मोठा आर्थिक अपहार केलेप्रकरणी पारनेर तालुका सैनिक बँकेच्या संचालक मंडळ व पदाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा २१ जुलै रोजी सहकार आयुक्त पुणे यांच्या कार्यालयासमोर तक्रारदारांसोबत उपोषण करण्यात येईल असा इशारा  अन्याय निर्मूलन सेवा समितीच्या वतीने जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी दिला आहे. 
            पारनेर तालुक्यातील अनेक कर्जदारांनी पारनेर सैनिक बँकेकडून कर्ज घेतले होते. कर्जदार शेतकऱ्यांचे कर्ज थकीत झाल्यानंतर बँकेने कर्ज घेतेवेळी गहाणखत करून ठेवलेल्या जमिनी व्यतिरिक्त कर्जदार व त्यांच्या कुटुंबियांच्या नावे असलेली वैयक्तिक मालमत्ता बेकायदेशीरपने लिलाव करून विक्री केल्याच्या तक्रारी यापूर्वी अनेकदा आपणाकडे करण्यात आल्या होत्या. या तक्रारी बाबत सहाय्यक निबंधक यांनी देखील चौकशी अहवाल देऊन त्यात बँकेने बेकायदेशीर लिलाव प्रक्रिया राबवल्याचे अहवाल सहाय्यक निबंधक पारनेर यांनी दिला होता. तरी देखील हे बँकेचे अधिकारी व संचालक मंडळ दोषी असताना देखील त्यांच्यावर अद्याप कुठलीही कार्यवाही झालेली नाही. याबाबत अनेकदा जिल्हाधिकारी, निबंधक आयुक्त, व सहकार आयुक्तांना अनेकदा बँकेवर कार्यवाही करण्याठवी यासाठी अनेकदा निवेदने देऊन देखील अद्याप त्यांच्यावर कार्यवाही झाली नसल्याने अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही.
         या सर्व प्रकरणाची प्रशासकीय अधिकाऱ्यांच  नेमणूक करून उच्चस्तरीय चौकशी करून १५ दिवसांच्या आत पारनेर सैनिक बँकेच्या संचालक व पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अन्यथा सहकार आयुक्त पुणे यांच्या कार्यालयासमोर २१ जुलै रोजी अन्याय निर्मूलन सेवा समितीचे पदाधिकारी व अन्यायग्रस्त कर्जदार यांच्यासमवेत उपोषण करण्यात येईल असा इशारा अन्याय निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी निवेदनाव्दारे सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

Post a Comment

0 Comments