तहसिलदार ज्योती देवरे यांची निघोजमध्ये धडक कारवाई;मास्क न घालनाऱ्यांना दिला चोप---
निघोज,ता.७:
निघोज(ता.पारनेर)येथे बसस्थानक परीसरात रस्त्यावरच भाजीपाला,मासे विक्री,तसेच अन्य व्यवसायका मुळे होत असलेल्या गर्दीमुळे कोरोना संसर्गाचा धोका अधिक होऊ शकतो तसेच अनेक नागरिक प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन करत नाही म्हणून तहसीलदार ज्योती देवरे यांनी मंगळवार (दि.७) रोजी निघोज मध्ये याविरोधात मोहीम राबवत पथकासह चौकामध्ये हातामध्ये काठी घेऊन थांबत विनाकारण फिरणाऱ्या व नियमाचे पालन करत नसणाऱ्या नागरिकांवर धडक कारवाई केली.
यावेळी सरपंच ठकाराम लंके,कामगार तलाठी विनायक निंबाळकर यांच्यासह महसुल,पोलीस प्रशासनाचे कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.आज सांयकाळी (५.वा.)नंतर चालु असलेल्या काही व्यवसायकांची दुकाणे सिल करून काही दुचाकी वाहनावर तसेच विनाकारण विना मास्क न घालता रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्यावरही ही १८८ नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे अशी माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली
आज मंगळवार आठवडे बाजार असल्यांने मोठ्या प्रमाणांत नागरीकांनी गर्दि केली होती,त्यामुळे तहसीलदार ज्योती देवरे यांच्यासह पथकाने टू व्हीलर व फोर व्हीलर या गाड्यांवर येणाऱ्या प्रवाशांवर प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन न करणाऱ्यावर वर कारवाई करण्यांत आली अनेक दुचाकी चारचाकी वाल्यांनी महसूल पथक कारवाई करत असल्याचे पाहून माघारी जाण्यास पसंती दिली. सुरू असलेल्या या कारवाईमुळे अनेक येणाऱ्या-जाणाऱ्याना वचक बसेल व गावात नियमबाह्य प्रवेश करणाऱ्यांवर आळा बसेल.
लॉक डाऊन सुरू झाल्यानंतर तहसीलदार ज्योती देवरे यांनी प्रथमच हातामध्ये काठी घेऊन प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्यासाठी नागरिकांना सक्त ताकीद दिली तसेच काही लोकांच्यावर काठी चालवली त्यामुळे त्यावेळी लोक घरामध्ये थांबले तालुक्यामध्ये लॉकडाऊन चे सुरुवातीला काटेकोरपणे पालन केले गेले मात्र अलीकडे नियमांमध्ये शिथिलता आल्यामुळे लोकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली मात्र आज पुन्हा तहसीलदार यांनी हातात काठी घेतल्यामुळे या गर्दीला लगाम बसेल अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू होती.

![]() |
| निघोज(ता.पारनेर)येथिल बसस्थानक परीसरात रस्त्यावर विनाकारण मोकाट फिरणाऱ्यावर कारवाई करतांना तहसीलदार ज्योती देवरे,कामगार तलाठी विनायक निंबाळकर,सरपंच ठकाराम लंके, महसुल पथक व अन्य. |
यावेळी सरपंच ठकाराम लंके,कामगार तलाठी विनायक निंबाळकर यांच्यासह महसुल,पोलीस प्रशासनाचे कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.आज सांयकाळी (५.वा.)नंतर चालु असलेल्या काही व्यवसायकांची दुकाणे सिल करून काही दुचाकी वाहनावर तसेच विनाकारण विना मास्क न घालता रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्यावरही ही १८८ नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे अशी माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली
आज मंगळवार आठवडे बाजार असल्यांने मोठ्या प्रमाणांत नागरीकांनी गर्दि केली होती,त्यामुळे तहसीलदार ज्योती देवरे यांच्यासह पथकाने टू व्हीलर व फोर व्हीलर या गाड्यांवर येणाऱ्या प्रवाशांवर प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन न करणाऱ्यावर वर कारवाई करण्यांत आली अनेक दुचाकी चारचाकी वाल्यांनी महसूल पथक कारवाई करत असल्याचे पाहून माघारी जाण्यास पसंती दिली. सुरू असलेल्या या कारवाईमुळे अनेक येणाऱ्या-जाणाऱ्याना वचक बसेल व गावात नियमबाह्य प्रवेश करणाऱ्यांवर आळा बसेल.
लॉक डाऊन सुरू झाल्यानंतर तहसीलदार ज्योती देवरे यांनी प्रथमच हातामध्ये काठी घेऊन प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्यासाठी नागरिकांना सक्त ताकीद दिली तसेच काही लोकांच्यावर काठी चालवली त्यामुळे त्यावेळी लोक घरामध्ये थांबले तालुक्यामध्ये लॉकडाऊन चे सुरुवातीला काटेकोरपणे पालन केले गेले मात्र अलीकडे नियमांमध्ये शिथिलता आल्यामुळे लोकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली मात्र आज पुन्हा तहसीलदार यांनी हातात काठी घेतल्यामुळे या गर्दीला लगाम बसेल अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू होती.
वडनेर,लोणीमावळा,बाभुळवाडे,वडझिरे,पिंपरी जलसेन,जवळे येथिल घटनांचा विचार करता सर्व नागरीकांनी तोंडाला मास्कचा नियमित वापर करा,शारीरिक अंतर पाळा,घराबाहेर विनाकारण फिरु नका,प्रशासनास सहकार्य करा."सुरक्षित रहा,सतर्क रहा,प्रशासनाला सहकार्य करा,पुनश्य एकदा लक्षात घ्या आपल्या गावची सर्वांगिन सुरक्षा आपल्याच हातात आहे."ठकाराम बाळाजी लंके.सरपंच तथा अध्यक्ष ग्राम सुरक्षा समिती.निघोज

0 Comments