वृक्षसंवर्धन काळाची गरज - पंकज कारखिले

रोख ठोक न्यूज:-
     राळेगण थेरपाळ येथे वनविभागाच्या वतीने चिंच, आवळा, आपटा, करंज, खैर, पिंपळ, सिताफळ अशा विविध जंगली झाडांची लागवड करण्यात आली.
     सरपंच पंकजदादा कारखिले म्हणाले पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जंगली झाडांचे संगोपन करणे आवश्यक आहे. वनविभागाचे कर्मचारी व्यवस्थित देखभाल घेत आहेत त्यामुळे त्यांचे कौतुक केले व संत तुकाराम महाराज पुरस्कारासाठी प्रस्ताव दाखल केला असल्याचे सांगितले.
   वृक्षारोपण कार्यक्रमासाठी लोकनियुक्त सरपंच पंकजदादा कारखिले, उपसरपंच योगेश आढाव, प्रवीण कारखिले, नरेश सोनवणे, संदीप घावटे, मंगेश कार्ले, माऊली शितोळे, अतुल मोरे, व्हाईस चेअरमन दामोदर टकले, शिरीष कार्ले, सुभाष आढाव, बाळासाहेब ज्ञानदेव कारखिले, विनोद कारखिले, अनिकेत कारखिले, किशोर कारखिले, पंकज किसन कारखिले, वनपाल सौ जगताप, वनपाल, श्री जाधव, प्रमोद कारखिले, स्वराज आढाव, सुयश कारखिले, संकेत कारखिले, स्वप्नील कारखिले, अक्षय कारखिले, अभिजीत कारखिले, दिपक कारखिले, रामदास कारखिले, हनुमंत कारखिले आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments