डॉ श्रीकांत पठारे यांना मराठी पत्रकार संघाचा "कोरोना योद्धा" पुरस्कार जाहीर


पारनेर 
      कोरोना विषाणू महामारिच्या काळात महत्त्वपूर्ण वैद्यकीय सेवा बजावून रुग्णांना तातडीची रुग्ण सेवा दिल्याबद्दल पारनेर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने ओंकार हॉस्पिटल चे संचालक तथा पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे यांना "कोरोना योद्धा" पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 
       लॉक डाऊन काळात सर्वत्र कोरोना विषाणू व महामारीने थैमान घातले होते. अशात नागरिकांना घराबाहेर पडणे शक्य नसल्याने अनेक गरजू व गरीब रुग्ण वैद्यकीय उपचारापासून वंचित राहत होते. या सर्वांवर उपचार व्हावेत व सर्वांना वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लॉक डाऊन काळात डॉ श्रीकांत पठारे यांनी रुग्णांना घरी जाऊन मोफत रुग्ण सेवा दिली. तसेच त्यांच्या ओंकार हॉस्पिटल मध्ये रुग्णांवर २४ तास अत्यल्प दरात उपचार केले. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून डॉ पठारे यांनी लॉक डाऊन काळात सलग ३ महिने रुग्णांना अविरत सेवा दिली. डॉ पठारे हे पंचायत समिती सदस्य असल्याने रुग्ण सेवे बरोबरच लॉक डाऊन काळात पारनेर तालुक्यातील सुमारे ४५० ते ५०० कुटुंबांना त्यांनी जीवनावश्यक वस्तू व किराणा मोफत वाटप केला. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना पारनेर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने "कोरोना योद्धा" पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. लवकरच त्याचे वितरण करण्यात येणार असल्याचे पारनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्ता गाडगे सर यांनी सांगितले.
       कोरोना महामारीच्या काळात पारनेर तालुक्यातील जनतेची महत्त्वपूर्ण सेवा बजावणारे अनेक प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांना देखील पारनेर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने कोरोना योद्धा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यामध्ये पारनेर तहसीलदार ज्योती देवरे, आमदार निलेश लंके, पारनेर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक राजेश गवळी, माजी जिल्हा परिषद सदस्य सुजित झावरे, शिवबा संघटना, डॉ आकाश सोमवंशी, शिक्षक आनंदा झरेकर, आरोग्यसेविका सोनाली गुंड,ग्रामपंचायत कर्मचारी शशिकांत साळवे आदींचा "कोरोना योद्धा" पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती पारनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्ता गाडगे सर यांनी दिली.

Post a Comment

0 Comments