भर पावसात रस्त्यातील झाडे केली दूर ; राळेगण थेरपाळ मध्ये एक पाऊल सामाजिक कार्याचे
रोख ठोक न्यूज
राळेगण थेरपाळ येथे आज जोरदार वादळासह पाऊस झाला यावेळेस अनेक झाडे रस्त्यावर उन्मळून पडली. झाडे रस्त्यावर पडल्यामुळे रस्ता पूर्ण जाम झाला व गाड्यांची मोठी रांग शिरूर - बेल्हे या रस्त्यावर लागली. झाडे रस्त्यावर पडल्यामुळे प्रवाशी ञस्त झाले होते.
राळेगण थेरपाळ गावचे लोकनियुक्त सरपंच पंकजदादा कारखिले यांनी भरपावसात रस्त्यावरील झाडे बाजूला काढण्यासाठी मदत केली यावेळी विविध कार्यकारी सेवा सोसायटी संचालक शशिकांत कारखिले, प्रवीण कारखिले, सुभाष आढाव, आदर्श कारखिले, प्रभाकर सरोदे, रामदास चव्हाण, सुनिल कोकणे, मंगेश कार्ले, पप्पू शिंदे, संतोष बर्वे, प्रकाश हांडे, गुलाब शेख, दीपक कारखिले आदी कार्यकर्ते उपस्थित होते. अगदी कमी कालावधीत रस्ता मोकळा झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.

0 Comments