आपली गाडी म्हणजे जनता बस, कोणीही हात करा ;आ निलेश लंके



जवळ्यात सुमारे एक कोटींच्या विकास कामांची उद्घघाटने--

निघोज प्रतिनिधी -
तुमची सगळी ताकद माझ्यात म्हणूनच मला दररोज काम करण्याची ऊर्जा ,पारनेर नगर मतदार संघाची कौटुंबिक जबादारीची जाणीव असल्याने घरून निघतानाच गाडीची काच खाली करून निघत असतो  रस्त्यात जनतेच्या अडचणी सोडवत यावे लागते,तेव्हा आपली गाडी म्हणजे जनता बस आहे कुठेही हात करा थांबेल,,असे मत आमदार निलेश लंके यांनी जवळे येथे बोलताना व्यक्त केले.
जवळे (ता. पारनेर) येथे आ निलेशजी लंके यांचे हस्ते विविध विकासकामांचे उदघाटन व लोकार्पण ,, करतांना सरपंच सौ रत्नमाला शिंगाडे,उपसरपंच किसनराव रासकर व ग्रामस्थ .

        पारनेर नगर मतदार संघाची आ लंके यांची संघटनात्मक वाटचाल संपुर्ण राज्याने पहिली असून त्यात दिगगजांचा पराभव करत संपूर्ण मतदार संघाला कलाटणी देणारा तालुका म्हणून अनुभवला  मा आ  निलेश लंके यांच्या प्रयत्नातून विविध विकास कामाचे भूमिपूजन जवळे (ता.पारनेर) येथे दि ३१ जुलै रोजी  सुमारे एक कोटी रु खर्चाच्या  विकासकामांचे उदघाटन व लोकार्पण सोहळा आ लंके हस्ते पार पडला  यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृ उ समिती सभापती प्रशांत गायकवाड हे होते .
  या वेळी बोलताना आ लंके म्हणाले की,कुणीही कुणाच्या रूपावर जाऊ नका तालुक्यात काहीजण म्हणत होते तालुका चालवणे म्हणजे येड्या गबाळ्याचे काम नाही येड्यांच्या हातात सत्ता देणार का पण या येड्यांनीच राज्याने आदर्श घ्यावा असे ऑनलाईन शिक्षण पुढे आणले, व लॉक डाउन च्या काळातही तालुक्यात आघाडी सरकारच्या काळात गेली १५ वर्षे राखडलेली विकास कामे करत सुमारे दोन ते अडीच लाख लोकांना जेवणाची व्यवस्था केली  जनतेची कामे करण्यासाठी 'पर्सनॅलिटी' ची नाही तर 'पॉझिटिव्ह एनर्जी' ची गरज आहे हे मला जनतेकडून कळले आपण उगाचच ' त्यांना' शहाणे समजत होतो ,, असा टोलाही लंके यांनी माजी आमदारांचे नाव न घेता लगावला .
जागतिक कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लोकाजागतिक कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लोकांनी काळजी घ्यावी आपण लोकांच्या सेवेसाठी बांधील आहोत लोकांनी आपल्याला भरभरून दिले आहे त्याची परतफेड आपण करत राहणार असल्याचे ग्वाही त्यांनी यावेळी उपस्थिताना दिली,
यावेळी रा कॉ तालुका अध्यक्ष बाबाजी तरटे, सरपंच सौ रत्नमाला शिंगाडे,उपसरपंच किसनराव रासकर, उद्योजक बाळासाहेब  सालके,सरपंच ठकाराम लंके ,पंकज कारखीले, डॉ आबासाहेब खोडदे, माजी सभापती सुदाम पवार,आण्णा पाटिल बढे,प्रदीप सोमवंशी, संभाजी खामकर, ग्राम .सदस्य,कानिफ पठारे,नाथा रासकर,,राजू लोखंडे,संदीप सालके,भाऊ आढाव,अरुण रासकर,नवनाथ रासकर ,संभाजी आढाव,संतोष सालके, राजू आढाव,रामदास गाडीलकर,गोपी पठारे, पोपट पिसाळ,भगवान सालके, आदि उपस्थित होत .

"पंधरा वर्षात जेवढि विकास कामे झाली नाही,ति येत्या पाच वर्षात मार्गी लागलेली असतील,मात्र सध्या तालुक्यातील जनतेला कोरोना महामारीच्या संकटात मदत करणे महत्वाचे आहे,"तालुक्याच्या विकासाचा मास्टर प्लॅन तयार आहे" त्याच पद्धतीने तालुक्यात ग्रामविकासाची संकल्पना राबवून "राज्यात आदर्शवत असा रोल मॉडेल म्हणून आपला तालुकाओळखला जाईल".(आमदार लोकनेते- निलेश लंके)

Post a Comment

0 Comments