“मी पाहिलेले कुटुंबप्रमुख ते मुख्यमंत्री”
खरतर शिवसेनेच्या परिवारात आपले स्वागत कुटुंबप्रमुखाच्या हस्ते व्हावं ही माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील मुलींसाठी निश्चितपणे भाग्यांची बाब. ज्या वेळी मातोश्रीवर पाय ठेवलात्यावेळी माझे हातपाय लटलट कापत होते. माझे वडील ही माझ्यासोबत होते.मातोश्रीवरची लगबग,धावपळ मी डोळ्यात साठवत होते. कारण कधी स्वप्नात देखील वाटलं नव्हतं मी मातोश्रीवर जाईल आणि उद्धवजींना भेटेल. पण हे सगळं शक्य झालं ते आदरणीय आ. निलमताई गो-हे मुळे.
मला बंगल्यात बोलवलं बाहेर सगळी मिडीया बसली होती.काही सुचत नव्हतं तितक्यात सांगण्यात आलं की तुम्ही इथे नका भेटू आत साहेब स्वतः तुमच्यासोबत बोलणार आहे. आणि आम्हाला आत घेऊन गेले जरा भितीच होती नक्की काय बोलतील साहेब मग मी त्यावर काय प्रतिक्रिया देईल.
जरा पाणी वैगेरे घेतलं तितक्यात साहेब आत आले आणि 5-10 मिनीट नाही तर तब्बल 45 मिनीटे त्यांनी संवाद केला. बाहेर निवडणुकीची धामधूम सुरू होती, पण त्यात ही त्यांनी मला आणि माझ्या कुटुंबाला इतका वेळ देण म्हणजे आश्चर्याची बाब होती. त्या 45 मिनिटांत मला खूप काही प्रश्न विचारले. मग ते माझ्या शिक्षणापासून ते शेतीपर्यंत.
ज्यावेळी शेतीविषयी मी माझी मत सांगितली त्यावर त्यांनी चर्चा करत करत विषय पीक विमा कंपन्यापर्यंत आला. त्यावर साहेबांनी खडानखडा आकडेवारी सहीत पीक विमा कंपन्यांतील घोटाळा, अडवणूक, फसवणूक कशी होती यांची माहिती दिली मी पुर्णपणे अचंबित होऊन ते ऐकत होती ज्या व्यक्तीनी शेती कधी केली नाही त्या व्यक्तीने शेतीविषयावर इतकं परफेक्ट सांगाव हे सांगत असताना साहेब मला आदरपुर्वक बोलले माझे वडील ही शेजारी होते.त्यावर नंतर बोलताना साहेब सगळ्यांसमोर बोलले की मी तुम्हाला अस काही बोलणार नाही तुला अस बोलले. “तु आम्हाला लेकीसारखी आहे आणि तु आज परिवाराची लेकच झाली आहे” हे ऐकताच काय कराव सुचत नव्हतं डोळे भरून आले होते पण सावरलं.
कुटुंबप्रमुखाची भुमिका चोख रित्या सांभाळणारे मी पाहिलेले आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब..
या मुलाखतीत खा.एकनाथ काका शिंदे, आ. निलमताई गो-हे, मा. मिलींदजी नार्वेकर, आ. नरेंद्रकाका दराडे आदी मान्यवर देखील उपस्थित होते. आता राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आम्ही सगळे शिवसेना परिवारातील सदस्य तसेच महाराष्ट्र पाहत असलले मुख्यमंत्री..
मोठ्या राजकीय उलथापालथेनंतर साहेब मुख्यमंत्री झाले.अत्यंत कठीण परिस्थितीत उद्धवजी ठाकरे साहेब यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली तेच लगेच कोरोनाच्या रूपानं साथीच्या रोगाचं संकट आलं. मुंबईत याचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला असून देशात कोविडचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. या परिस्थितीला गेल्या चार महिन्यांपासून उद्धवजीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकार तोंड देत आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या लॉकडाऊनमधून महाराष्ट्र हळूहळू स्थिर होत असतानाच निसर्ग चक्रीवादळाचं संकट उभं ठाकले होते त्याला ही मुख्यमंत्र्यांनी धीरोदात्तपणे तोंड दिले.
मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सुरुवातीलाच इतक्या मोठ्या आव्हानांना सामोरं जावं लागलेले उद्धव साहेब हे पहिलेच मुख्यमंत्री असतील. मुंबईसारख्या लोकसंख्येची मोठी घनता असलेल्या शहराकडे सगळ्या जगाचे लक्ष लागून राहिले होते. धारावीमध्ये सरकारने प्रयत्नपूर्वक कोरोना विषाणूचा संसर्ग रोखला आहे. त्याची दखल जागतिक आरोग्य संघटनेनेही घेतली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अडोनॉम गेब्रेयसिस यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचे कौतुक केले आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे कोणतीही माहिती लपवत नाही,याचेसुद्धा कौतुक वॉशिंग्टन पोस्ट या अमेरिकेतील सुप्रसिद्ध वर्तमानपत्राने केलेले आहे. मुख्यमंत्री व्यापारी, उद्योजक यांना विश्वासात घेऊन, धीर देत महाराष्ट्र हळूहळू अनलॉक करत आहेत. महाराष्ट्रातून आतापर्यंत अंदाजे 10 ते 15 लाख परप्रांतीय मजुरांनी त्यांच्या मूळ राज्यात स्थलांतर केले होते, महाराष्ट्रात मुख्यमंत्री हे परिस्थिती नियंत्रणात आणत असल्यामुळे हे परप्रांतीय मजूर पुन्हा महाराष्ट्रात परत येत आहेत.
मुख्यमंत्री हे आमच्या महाराष्ट्राचे आहेत, आमच्या हक्काचे आहेत. त्यांनी केलेल्या चांगल्या गोष्टीचे कौतुक करणे हे आपले कर्तव्य आहे.
आज त्यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांना लाख लाख भगव्या शुभेच्छा.. साहेब आमच्या सर्वांचं आयुष्य देखील तुम्हाला लाभो आणि तुम्ही त्यात हिमतीने महाराष्ट्रासाठी सज्ज रहावे हिच ईश्वर चरणी प्रार्थना करते.तुमच्या मायेच्या,ऊबेच्या पंखामुळे महाराष्ट्र सगळ्यांतुन सावरले हा विश्वास आम्हाला तुमच्यात दिसतो.
लेखिका – कु.शर्मिला सुभाषराव येवले. रा.इंदुरी,ता. अकोले, जि.अहमदनगर.Sharmilayewale1998@gmail.com

0 Comments