राज्यस्तरीय शोध कलेचा स्पर्धेत कांचन साबळे राज्यात प्रथम

रोख ठोक न्यूज :- चंद्रकांत कदम
    माय मराठी न्यूज आयोजित राज्यस्तरीय शोध कलेचा या स्पर्धेत उत्कृष्ठ अभिनय केल्याबद्दल शिरूर तालुक्यातील निमगाव भोगी येथील कू कांचन बळवंत साबळे हीचा अभिनय विभागात राज्यस्तरीय विजेतेपद मिळाले आहे.
     ग्रामीण भागातील मुलांना व कलाकारांच्या सप्तगुनांना वाव मिळावा या उद्देशाने माय मराठी न्यूज तर्फे राज्यस्तरीय शोध कलेचा या ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. शिरूर तालुक्यातील निमगाव भोगी येथील कुमारी कांचन बळवंत हिने या ऑनलाईन स्पर्धेत सहभाग घेतला होता. यामध्ये कांचन हिने संभाजी राजे जेव्हा मुघल कैदेत होते, जेव्हा शेवटची घटका डोळ्यासमोर होती, तेव्हाची संभाजी महाराजांची परिस्थिती आपल्या उत्कृष्ठ अभिनय द्वारे सादर केली होती. प्रक्षकांच्या अफाट प्रतिसाद व उत्कृष्ठ अभिनयाबद्दल कांचन साबळे हिला माय मराठी न्यूज च्या राज्यस्तरीय शोध मोहिमेचा उत्कृष्ठ अभिनय विभाग अंतर्गत राज्यस्तरीय विजेतेपद मिळाले आहे. 
        या स्पर्धेत नृत्य, गायन, वक्तृत्व, अभिनय व गायन प्रकारामध्ये पुरस्कार देण्यात आले असून नृत्य विभागात कादंबरी पंडित, वक्तृत्व विभागात आर्या माने, गायन विभागात गोविंद बचटे व अभिनय विभागात कांचन साबळे हिला राज्यस्तरीय नामांकन मिळाले आहे. अभिनय विभागात राज्यस्तरीय नामांकन मिळाल्याबद्दल कांचन साबळे हीचे सर्वत्र कौतुक होत आहे. कांचन ही बळवंत साबळे यांची कन्या तर वाडेगव्हाण येथील प्रगतशील शेतकरी दिलीप रासकर व निमगाव भोगी येथील युवा नेते सचिन बनकर यांची ती भाची आहे.

कांचन साबळे हीचा अभिनय 

Post a Comment

0 Comments