शेतकऱ्यांचे नुकसान ; कृषी अधिकाऱ्यांकडून पंचनामे सुरू
रोख ठोक न्यूज :- चंद्रकांत कदम
कोरोना मुळे शेतीला बाजार भाव नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला होता. त्यात नामांकित कंपनीचे बाजरीचे बियाणे शेतात पेरून देखील उगवले नसल्याने शेतकरी हतबल झाला असून अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आता शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. कृषी विभागाकडून पाहणी सुरू करण्यात आली असून पंचनामे करण्यात येत आहे.
कोरोना मुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला बाजापेठ उपलब्ध होत नसल्याने पिकवलेला माल विकायचं कसा ? हातातोंडाशी आलेला माल फेकून देण्याशिवाय पर्याय शेतकऱ्यांकडे नसल्याने त्यांना झालेला खर्च निघाला नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यात समाधानकारक कारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी बाजरी पिकाची पेरणी केली. नामांकित असणाऱ्या व शेतकऱ्यांची पसंती असणाऱ्या नामांकित कंपनीचे बाजरी बियाण्याची शेतकऱ्यांनी पेरणी केली. पेरणी झाल्यानंतर समाधानकारक पाऊस देखील झाला. परंतु पेरणी होऊन आठवडा झाल्यानंतर देखील बाजरी उगवली नसल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. शेजारी असणाऱ्या शेतकऱ्यांनी देखील त्याच कंपनीचे बियाणे पेरले असल्याने त्यांचे देखील बियाणे उगवले नसल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. इतर भागातील शेतकऱ्यांशी याबाबत चर्चा केल्यानंतर "त्या नामांकित" कंपनीचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी देवीभोयरे, पठारवाडी, पिंपरी जलसेन, निघोज, जवळा या शेतकऱ्यांनी केल्या आहेत. आता सर्व शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार असल्याने आता येणारा खर्च शेतकऱ्यांना परवडणारा नाही.
नामांकित कंपनीने शेतकऱ्यांना जुने बियाणे देऊन गंडा घातला असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून येत असून सर्व नुकसान ग्रस्त शेतीचे पंचनामे करून तात्काळ मदत मिळावी. व त्या नामांकित कंपनीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
पंचनामे करून मदत मिळावी -
अनेक गावांतील शेतकऱ्यांनी "त्या नामांकित" कंपनीचे बाजरी बियाणे खरेदी केले होते. त्या सर्वच शेतकऱ्यांची बाजरी उगवली नसल्याची लक्षात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले असून शासन दरबारी आम्हास पंचनामे करून मदत मिळावी व खोटे बियाणे देऊन शेतकऱ्यांना गंडा घालणाऱ्या त्या नामांकित कंपनीवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी शेतकरी संतोष भाऊ गाजरे यांनी केली आहे.
राहुरी कृषी विद्यापीठाकडून पाहणी करून पंचनामे सुरू - कृषी अधिकारी
"त्या नामांकित" कंपनीचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी देवीभोयरे, पठारवाडी, पिंपरी जलसेन, निघोज, जवळा या शेतकऱ्यांनी केल्या आहेत. राहुरी कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना बोलावून नुकसान ग्रस्त शेतीची पाहणी करून निष्कर्ष देत आहे. व कृषी विभागाच्या वतीने पंचनामे सुरू आहेत. आणखी शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नाही त्यांनी लेखी तक्रार करावी. रामदास दरेकर - तालुका कृषी अधिकारी

0 Comments