पारनेर
पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील सुपुत्र बाबाजी लक्ष्मण कदम यांची नुकतीच एसटी महामंडळाच्या मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयाच्या महाव्यवस्थापक पदी निवड झाली आहे.
पिंपरी जलसेन हे दुष्काळी गाव म्हणून गावची ओळख. शेतीला पाणी नाही, पाऊस कमी, नशिबी बाराही महिने दुष्काळ लिहिलेला असताना गावाला राहून करायचं काय ? खायचं काय ? असे अनेक प्रश्न या ध्येय वेड्या तरुणाला सतावत असताना अशा परिस्थितीत आयुष्यात काही तरी करायचं ! हे ध्येय मनाशी बाळगून अत्यंत गरीब परिस्थितीतून शिक्षण घेऊन जिद्द व चिकाटीच्या जोरावर बाबाजी लक्ष्मण कदम यांनी १९८६ मध्ये एस टी महामंडळा मध्ये भांडार (स्टोअर) अधिकारी म्हणून रुजू झाले. त्यांनी एस टी महामंडळाच्या यवतमाळ ,नागपूर , औरंगाबाद , पुणे , ठाणे व मुंबई विभागात विविध पदावर काम केले आहे. सदर कामगिरी करत असताना त्यांना वेळोवेळी बढती मिळून ते महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथे गेल्या काही वर्षांपासून उपमहाव्यवस्थापक या पदावर कार्यरत आहेत. आपल्या कामाची हातोटी व काम करण्याची शैली यामुळे त्यांची नुकतीच मुंबई मध्यवर्ती कार्यालयाच्या महाव्यवस्थापक या पदावर बढती झालेली आहे. त्यांच्या या कामगिरी मुळे पिंपरी जलसेन गावचे नाव उज्वल झाले असल्याने त्यांचे पिंपरी जलसेन ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

19 Comments
अभिनंदन साहेब
ReplyDeleteअभिनंदन सर
ReplyDeleteआभिनंदन साहेब
ReplyDeleteAbhinandhan Sir
ReplyDeleteCongratulations sir
ReplyDeleteCongratulations sir
ReplyDeleteअभिनंदन सर
ReplyDeleteअभिनंदन सर
ReplyDeleteअभिनंदन सर
ReplyDeleteअभिनंदन सर.
ReplyDeleteहार्दिक अभिनंदन साहेब
ReplyDeleteहार्दिक अभिनंदन साहेब
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteहार्दिक अभिनंदन साहेब
ReplyDeleteएस. टी. को. ऑप. बँक दापोडी शाखे तर्फे हार्दीक अभिनंदन साहेब
ReplyDeleteCongregation sir.
ReplyDeleteCongratulations Mr.Babaji Kadam from Manjunatha Kanchan
ReplyDeleteCongratulations sir Mr Babaji kadam from mohan rahinj (parner)
ReplyDeleteAbhinandan
ReplyDelete