निघोज येथे गोरगरिबांना संसारपायोगी साहित्य वाटप
रोख ठोक न्यूज निघोज :-जनसेवा हिच ईश्वरसेवा समजून सर्वसामान्यांना अडचणीच्या काळात मदतीचा हात दिला तर त्यात आत्मिक समाधान मिळते,त्याच बरोबरच आपण दुसऱ्यांच्या अडीअडचणी ,दुःखही कमी शकतो असे प्रतिपादन आमदार लोकनेते निलेश लंके यांनी केले. मंगळवार( दि.९) रोजी निघोज(ता.पारनेर)येथे गोरगरीब कुटूंबाना संसार उपयोगी साहीत्याचे वाटप केले याप्रसंगी ते बोलत होते.
मार्च महीण्यांपासून कोरोणाच्या काळात गावपातळीवर अत्यंत बिकट स्थिती निर्माण झाली होती.अनेक ठिकाणी गाव बंद ठेवण्यांत आले होते, अशा स्थितीत गावातील अनेकांचे रोजगार बंद झाले होते,हाताला काम,धंदा नसल्यांने अनेकावर उपासमारीची वेळ आली होती त्यामुळे असे उपक्रम राबविणे ही खरी काळाची गरज आहे असे आमदार निलेश लंके म्हणांले.
यावेळी मळगंगा पतसंस्थेचे अध्यक्ष प्रभाकर कवाद,जी एस महानगर बँकेचे उपाध्यक्ष भास्कर कवाद,माजी उपाध्यक्ष आप्पासाहेब लामखडे,
संचालक बबनशेठ लंके,निघोज पतसंस्थेचे अध्यक्ष वसंतराव कवाद,मळगंगा ट्रस्टचे कोषाध्याक्ष ज्ञानदेव लंके,सचिव शांताराम कळसकर,सरपंच ठकाराम लंके,उद्योजक सुरेश धुरपते,पांडूरंग कृपा पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत लंके,सोमनाथ वरखडे,बबन तनपुरे, अंकुश लोखंडे, सुनिल वराळ,राजु रसाळ,शंकर लामखडे ,विश्वास शेटे, बाळासाहेब लंके, संदिप वराळ व सर्व ग्रामपंचायत सदस्य,कर्मचारी,अनेक ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
ग्रुप ग्रामपंचायत निघोज,निघोज नागरी पतसंस्था,मळगंगा डेअरी फार्म(कन्हैया दुध उद्योग समुह),मळगंगा नागरी पतसंस्था,सरपंच ठकाराम लंके मित्र परीवार व स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहकार्याने परीसरातील सहाशे गरीब कुटूंबाना संसार उपयोगी साहीत्यांचे वाटप करण्यांत आले.
सामाजिक धायित्व या भावनेतून गावातील हातावर पोट भरणांऱ्याअनेक गोर,गरीब कुटूंबाना एक मायेचा आधार मिळावा या उदात्त हेतूने सहाशे कुटूंबाना यावेळी संसार उपयोगी साहीत्यांचे वाटप करुन महामारीच्या संकटात कर्तव्य म्हणून गोरगरीबांना मदतीचा हात देण्यांचा हा अल्पसा प्रयत्न केला असे यावेळी बोलतांना सरपंच ठकाराम लंके म्हणांले.
मळगंगा ट्रस्टचे सचिव शांताराम कळसकर व पांडूरंग कृपा पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत लंके यांनी सर्वांचे आभार मानले.

0 Comments