कर्जदार व अन्याय निर्मूलन सेवा समितीचा इशारा
पारनेर
बेकायदेशीरपणे कर्जदारांच्या शेतजमिनीचा लिलाव करून कवडीमोल भावात विक्री करणे, सरचर्ज शासकीय खात्यात न भरता शासनाची फसवणूक करून शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या पारनेर सैनिक बँकेच्या संचालक व अधिकाऱ्यांवर लवकरात लवकर गुन्हे दाखल करण्यात यावेत अन्यथा पोलीस जिल्हाधिक्षक कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा कर्जदार सुरेश किरण रासकर, पुरुषोत्तम नारायण शहाणे, भरत दशरथ हटावकर, कृष्णनाथ नारायण शहाणे, सुनंदा रभजी शेळके व अन्याय निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी दिला आहे.
यापूर्वी अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी कर्जासाठी तारण ठेवलेल्या नसताना व तारण ठेवलेली मालमत्तेची प्रथम लिलाव पद्धतीने विक्री करणे गरजेचे असताना पारनेर सैनिक बँकेच्या अधिकाऱ्यांनी थकीत कर्जापोटी तारण नसलेली मालकी हक्काची शेतजमीन कवडीमोल भावात विक्री करण्याचा प्रकार अनेक शेतकऱ्यांसोबत केला आहे . यापूर्वी तक्रारदारांनी सहाय्यक निबंधक यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. याबाबत सहाय्यक निबंधकांनी चौकशी करून बँकेने केलेली शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा लिलाव पद्धत बोगस असल्याचा अहवाल उपनिबंधक अहमदनगर यांना दिलेला आहे. बँकेकडून करण्यात आलेली लिलाव पद्धत चुकीची असून शेतकऱ्यांच्या जमिनी चुकीच्या पद्धतीने लिलाव करून विक्री केल्याचे उघड झाले असताना देखील तक्रारदारांनी पाठपुरावा करून देखील अद्याप या बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेले नाहीत. गुन्हे दाखल करण्यासाठी तक्रारदार यांनी पोलिस स्टेशन चे उंबरे झिजवले आहे तरी देखील बँकेविरुद्ध तक्रार घेण्यास टाळाटाळ होत आहे. त्यामुळे उपविभागीय पोलिस अधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी यामध्ये लक्ष घालून तातडीने संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा १२ जून रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात कर्जदार, अन्यायग्रस्त व अन्याय निर्मूलन सेवा समितीच्या वतीने सामूहिक आत्मदहन करण्यात येईल असा इशारा सुरेश किरण रासकर, पुरुषोत्तम नारायण शहाणे, भरत दशरथ हटावकर, कृष्णनाथ नारायण शहाणे, सुनंदा रभजी शेळके व अन्याय निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी दिला आहे.
सबळ पुरावे व सहाय्यक निबंधक यांचे चौकशी अहवाल असताना देखील पारनेर सैनिक बँकेच्या गैरकारभराविरुद्ध पारनेर पोलिसांत तक्रार दाखल करून घेण्यास व आमचे म्हणणे ऐकून घेण्यास पोलिसांकडून टाळाटाळ होत आहे. याबाबत उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली आहे. लवकरात लवकर गुन्हा दाखल न झाल्यास १२ जून रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात कर्जदार व पिडितांसमावेत सामूहिक आत्मदहन करणार आहोत.
अरुण रोडे
अन्याय निर्मूलन सेवा समिती, अहमदनगर
अरुण रोडे
अन्याय निर्मूलन सेवा समिती, अहमदनगर


0 Comments