पिंपरी जलसेन तंटामुक्ती अध्यक्षपदी अभिमन्यू थोरात, उपाध्यक्षपदी रामदास शेळके व बबन घेमुड

पारनेर
    पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील तंटामुक्ती समितीची बैठक नुकतीच पार पडली असून तंटामुक्ती अध्यक्षपदी अभिमन्यू थोरात, उपाध्यक्षपदी रामदास शेळके व बबन घेमुड यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
पिंपरी जलसेन तंटामुक्ती अध्यक्षपदी अभिमन्यू थोरात, उपाध्यक्षपदी रामदास शेळके व बबन घेमुड यांची निवड झाल्यानंतर त्यांचा सत्कार करताना ग्रामस्थ . छाया - चंद्रकांत कदम.

       तत्कालीन अध्यक्ष मयत झाल्यानंतर जानेवारी २०२० पासून तंटामुक्ती अध्यक्ष पद रिक्त होते. २६ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत नवीन समिती निवडण्यात आली होती. परंतु लॉक डाऊन मुळे अध्यक्षीय निवड करण्यात आली नव्हती. आज शनिवारी (दि.१३). रोजी समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून अभिमन्यू प्रभू थोरात, उपाध्यक्षपदी रामदास काशिनाथ शेळके व बबन हरिभाऊ घेमुड यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य यशवंत अडसरे, ज्ञानदेव वाढवणे, उपसरपंच संदीप काळे, अंबादास काळे, विनोद कदम, पत्रकार चंद्रकांत कदम, कैलास घेमुड, विलास रणदिवे, साहेबराव शेळके, नारायण थोरात, भानुदास साळवे आदींसह ग्रामस्थ दगडू थोरात, रेवजी कदम, जगन काळे, विलास घेमुड, राजू थोरात आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments