"पारनेर च्या शिरपेचात मानाचा तुरा" वासुंदेच्या दिग्विजय झावरेंची अभिमानास्पद कामगिरी


 टाकळी ढोकेश्वर -
प्रतिनिधी

पारनेर तालुक्यातील "वासुंदे"येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाचा माजी विद्यार्थी असलेला त्याचबरोबर "टाकळी ढोकेश्वर" येथील श्री ढोकेश्वर महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी अन पारनेर  सारख्या ग्रामीण दुष्काळी तालुक्यातील "वासुंदे" या छोट्याश्या गावातील रहिवासी, आणि एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील श्री"मनोहर भास्कर झावरे"आणि "संध्या  मनोहर झावरे"या शेतकरी दाम्पत्याचा मुलगा अन साहसी युवा गिर्यारोहक ट्रेकर,पॅराग्लायडिंग या हवेतील साहसी क्रीडा प्रकाराचे पायलट,ट्रॅव्हलब्लॉग लेखक,मॅरेथॉन धावपटू,आहेत.

"पाथ फाइंडर एक्सप्लोरर्स"या साहसी भटकंती क्लब आणि त्याचबरोबर Maitraway.Com या ट्रॅव्हलस्टोरी  ब्लॉग संकेतस्थळाचे संस्थापक असलेल्या  "दिग्विजय मनोहर झावरे"या साहसी गिर्यारोहक युवकाला मुंबई येथील "मनुष्यबळ लोकसेवा अकादमी"सन्मानित "राष्ट्रीय स्तरावरील ग्लोबल अचिव्हर्स नेशन प्राईड प्रतिभा सन्मान अवॉर्ड 2020"साठी नामांकन मिळाले आहे. मुंबई येथील नामांकित प्रतिथयश "मनुष्यबळ लोकसेवा अकादमी" संचलित "ग्लोबल अचिव्हर्स प्रतिभा सन्मान अवॉर्ड सोहळा 2020" या समारंभाचा राष्ट्रीय स्तरावरील समारंभ 24 डिसेंबर 2020 रोजी भारताच्या राजधानीचे शहर असलेल्या नवी दिल्ली शहरात आयोजीत केला जाणार आहे. तर भव्य आंतरराष्ट्रीय समारंभ हा थायलंड च्या राजधानी चे शहर असलेल्या "बँकॉक"या शहरात 14 डिसेंबर 2020 रोजी आयोजित केला जाणार आहे.

दिग्विजय झावरे यांना साहसी भटकंती प्रवासाबद्दल लहानपणपासूनच विलक्षण अशी ओढ असल्यामुळे नैसर्गिकरित्या  त्यांचा ओढा हा गिर्यारोहण आणि इतर साहसी खेळाकडे, दुर्गभ्रमंती कडे वळू लागला.महाविद्यालयीन जीवनात असताना त्यांनी गिर्यारोहणमध्ये महाराष्ट्राचे एवरेस्ट शिखर"कळसुबाई शिखर सर केले.त्यानंतर रतनगड,हरिश्चन्द्रगड,सांधण व्हॅली सिहंगड,रायगड,राजगड,कलावंतीण दुर्ग,गोरखगड,पेमगिरी,शिवनेरी, तोरणा,विशालगड,प्रतापगड,लोहगड,पन्हाळा,रामशेज,साल्हेर असेल आणि इतर सह्याद्री ट्रेकिंग एक्सपेडीशन  दुर्गभ्रमंती मोहिमामध्ये मध्ये त्यांनी अतिशय उत्साहपूर्वक सहभाग नोंदविला आहे.  त्याचबरोबर हिमाचल प्रदेशातील धोलाधर हिमालयन पर्वतराजी मध्ये असलेल्या,बिर बिलिंग,करेरी लेक  त्रिउंड,मिनकेनि पास,बराउणी माता,जखनि माता,काश्मीर मधील लेह लडाख,उत्तराखंड मधील नाग तीब्बा,केदारकंठा पीक ह्या हिमालयन ट्रेकिंग मोहिमा केलेल्या आहेत.

तसेच एप्रिल -मे 2019 मध्ये नेपाळ मधील जगातील सर्वोच्च ऊंची असलेला एवरेस्ट बेस कॅम्प ट्रेकिंग मोहिम देखील गतवर्षी त्यांनी  यशस्वीरित्या पूर्ण केलि आहे. दिग्विजय झावरे यांच्या मोहिमा या फक्त्त ट्रेकिंग किव्हा गिर्यारोहण मोहिमा पर्यंत मर्यादित नसून त्यांना अनेक पर्यावरणस्नेही
,सामाजिक उपक्रमाची ते नेहमीच जोड  देत  असतात.त्याचबरोबर ते प्रवासवर्णने लिहितात.त्यासाठी त्यांनी स्वतःचे एक संकेतस्थळ देखील स्थापन केलेले आहे.त्यामाध्यमातून ते साहसी  पर्यटन रसिकाना विविध पर्यंटन स्थलांची इत्यंभूत माहिती प्रसारित करत असतात.जगभरातील सात खंडावरील सात सर्वोच्च पर्वत शिखरे सर करण्याची एक महत्वाकांक्षि आणि संपूर्ण जगभरात गिर्यारोहणातील एक कठीण माईलस्टोन समजली जाणारी.  आणि गिर्यारोहकांच्या शारीरिक,मानसिक क्षमतेची परीक्षा पाहणारी एक प्रतिष्टीत मोहिम"वर्ल्डस सेव्हन समीट ट्रेक  एक्सपेडीशन "मोहिम सुरुवात करण्याचा मनोदय आहे.पण सध्या जागतिक करोना साथ आजाराच्या भयानक प्रादुर्भावा मुळे ठप्प ठेवले आहे.या निवडी मुळे टाकळी ढोकेश्वर-वासुंदे परिसरात तसेच तालुक्यातून विविध ठिकाणावरुन मान्यवरांकडून दिग्विजय झावरे यांचे अभिनंदन होत आहे. तर कु.दिग्विजय झावरे आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय आपल्या प्रयत्नाबरोबरच आपले  आई-वडील आणी शिक्षकांना देतात.

Post a Comment

0 Comments