शेतकऱ्याचा मुलगा झाला तहसीलदार! पारनेर तालुक्यातील अळकुटीचा सुपूत्र राज्यसेवा परीक्षेत राज्यात ३३ वा

नुकत्याच जाहीर झालेल्या MPSC च्या परिक्षेत पारनेर तालुक्यातील अळकुटीचा सुपुत्राची तहसीलदार पदी निवड झाली आहे. तुषार सध्या कर व प्रशासकीय अधिकारी म्हणून चंद्रपूर नगरपरिषद मूल येथे कार्यरत आहेत.
  रोख ठोक न्यूज :- चंद्रकांत कदम

         
        महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 13 ते 15 जुलै 2019 दरम्यान घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत पारनेर तालुक्यातील अळकुटी म्हस्केवाडी रोड बहिरोबावाडी येथील तुषार निवृत्ती शिंदे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधून तहसीलदार पदी निवड झाली आहे. सध्या ते कर व प्रशासकीय अधिकारी म्हणून चंद्रपूर नगरपरिषद मूल येथे कार्यरत आहेत. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असताना तुषार यांनी मिळवलेल्या यशाने कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.


तुषार यांच्या वडिलांचा छोटा बांधकाम व्यवसाय असून ते शेतकरी देखील आहे. त्यातुनच मंदिर कामांच्या कौशल्यातुन त्यांनी तुषार यांचे श्री साईनाथ हायस्कूल अळकुटी शिक्षण पुर्ण केले. गजानन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ओतूर येथे पदवीचे शिक्षण, नायपर इन्स्टिट्यूट मोहाली पंजाब येथे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.  तुषारमधील असणारी हुशारी पाहाता अनेक परीक्षा पास करत ते संध्या चंद्रपुर याठिकाणी नगरपरिषद मूल येथे कर व प्रशासकीय आधिकरी म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीतपणे यश मिळवत ते तहसीलदार पदाचे मानकरी ठरले आहेत. महाराष्ट्र राज्यात ३३ वा क्रमांक मिळवित त्यांनी तहसीलदार पदाचे मानकरी ठरले आहेत. घरची परस्थिती एकदम हलाखीची असताना तुषार यांनी घेतलेले कष्ट पुढच्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणारे आहेत. अभ्यास करताना अनेक अडचणी आल्या. मात्र, त्यांनी कधी जिद्दी सोडली नाही. आज ते तहसीलदार झाले यांचा आम्हाला व पुर्ण अळकुटीकरानां अभिमान वाटतोय, अशी प्रतिक्रिया योगेश जाधव, पत्रकार चंद्रकांत कदम, प्रवीण परंडवाल, अनंत पानमंद, राहुल पानमंद, विशाल शिंदे, रोहन गाडेकर, नंदकुमार शिंदे, नंदकुमार जाधव, अमोल नरड (मेजर), प्रशांत नरड या मित्रपरिवार सह ग्रामस्थांनी दिली आहे.


  • तुषार यांचा अल्प परिचय
  • 2012 मध्ये नॅशनल इन्सिट्युट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च (NIPER), मोहाली येथून एम फार्म.
  • 2013 ते 2014 विशाल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आळेफाटा येथे अध्यापनाचे कार्य
  • 2014 ते 2019 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा अभ्यास.

Post a Comment

0 Comments