चक्क.. पाच वर्षांचा विहान करतोय योगा


रोख ठोक न्यूज :- आळकुटी 

कोविड-१९ साथीमुळे रविवारी सार्वजनिक गर्दी टाळून डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा  झाला आहे.  २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला, तेव्हापासून पहिल्यांदाच हा दिन आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर झाला आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही योग दिनानिमित्त  योगासने करुन देशवासीयांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, योग दिन हा विश्व बंधुत्वाचा संदेश देणारा दिवस असल्याचे मोदींनी म्हटले होते . त्यासोबतच, आपल्या सृदृढ आयुष्यासाठी योगा अत्यंत महत्वाचा असल्याचे सांगत कोरोनावर मात करण्यासाठी योगासने करण्याचेही मोदींनी सूचवले. आपल्याकडे आहार युक्त,  विहारस्य, युक्त चेष्टस्य कर्मसु। युक्त स्वप्ना-व-बोधस्य, योगो भवति दु:खहा।। असं म्हणतात. म्हणजेच, कामकाज, जेवण, झोप, खेळ आणि सर्वकाही योग्यरितीने करायला हवे.
    कोविड-१९ साथीच्या आजारांची भीती  संपूर्ण जगाने घेतलेली आहे सध्या कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर काही लोक योगासना कडे वळले आहे तसेच  पारनेर तालुक्यातील लोणी मावळा गावातील विहान शशिकांत मापारी या पाच वर्षाच्या बालकाने योग दिनानिमित्त सर्व प्रकारचे योगा करून घरातील व शेजारील लोकांना योगासने करण्यासाठी प्रेरित केले आहे. विहान ला योगा कोणी शिकवलेले नाही त्याने स्वतः इंटरनेट, यूट्यूब च्या माध्यमातून योगा चे  व्हिडिओ पाहून त्याने योगा आत्मसात केले आहेत. विहान लॉक डाऊन च्या अगोदर पासून योगा करत आहे व त्याचे त्याला फायदेही खुप जाणवत आहेत.
    कोरोना आपल्या श्वसन यंत्रणेवर हल्ला करतो, पण प्राणायम केल्याने ही यंत्रणा मजबूत होते. प्राणायम करण्याचे अनेक प्रकार असून अनुलोम-विलोम, भ्रामरी इत्यादी प्रकार आहेत असे योगा बद्दल  विहान शेजारील लोकांना सांगत असतो.

Post a Comment

0 Comments